ठोस पुरावे आणा, केवळ चाचपणी कशाला?
By Admin | Updated: December 8, 2014 02:46 IST2014-12-08T02:46:22+5:302014-12-08T02:46:22+5:30
आमचा देश फसवणुकीच्या सर्व प्रकरणांमध्ये पूर्ण सहकार्य देईल. फसवणूक प्रकरणात किमान पुरावे तरी सादर केले जावे.

ठोस पुरावे आणा, केवळ चाचपणी कशाला?
मुंबई : विदेशातील काळा पैसा परत आणण्याबाबत भारताने सातत्याने पाठपुरावा चालविल्याच्या पार्श्वभूमीवर स्वीत्झर्लंडने कोणत्याही चाचपणी मोहिमेत सहभागी होणार नसल्याचे तसेच भारताचे अधिकारी कोणताही स्वतंत्र तपास न करता स्वीस बँकेतील सर्व भारतीय खातेदारांच्या नावांची माहिती मागू शकत नसल्याचे ठामपणे सांगितले आहे.
आमचा देश फसवणुकीच्या सर्व प्रकरणांमध्ये पूर्ण सहकार्य देईल. फसवणूक प्रकरणात किमान पुरावे तरी सादर केले जावे. भूतकाळात जे घडले ते मिटवता येणार नाही, असे भारतातील स्वीत्झर्लंडचे राजदूत लाइनस वॉन कॅसलमूर यांनी स्पष्ट केले. यापूर्वी स्वीस बँकेत जमा असलेले सर्व पैसे कराच्या दृष्टीने वैध नसतील, याच्याशी सहमती दर्शविताच ते म्हणाले की, गेल्या अनेक दशकांपासून या बँकेत विभिन्न स्रोताच्या माध्यमातून पैशाचा ओघ येत राहिला. खातेधारकांच्या चोरलेल्या यादीच्या आधारावर स्वीस अधिकाऱ्यांचे सहकार्य मागता येणार नाही. भारतीय तपाससंस्थांनी किमान फसवणुकीच्या प्रकरणांचा स्वतंत्र तपास करावा. आम्ही भारताची चिंता समजू शकतो. या मुद्यावर नि:संदिग्धपणे समजूतदारी दाखवायला हवी.