शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
4
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
5
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
6
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
7
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
8
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
9
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
10
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
11
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
12
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
13
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
14
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
15
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
16
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
17
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
18
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
19
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
20
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

Lendi River Bridge: पालघर जिल्ह्यातील लेंडी नदीवरील पूल अवजड वाहतुकीला बंद!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2025 08:31 IST

Lendi River Bridge News: पालघर जिल्ह्यातील लेंडी नदीवरील पूल अवजड वाहतुकीसाठी बंद करण्यात आले.

पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यातील अतिदुर्गम भागात असलेल्या वावर वांगणी येथील लेंडी नदीवरील पूल कमकुवत झाला असून या पुलावरून अवजड वाहतूक बंद करण्याचे आदेश मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आले आहेत.

जव्हार-सारसून रस्त्यावरील लेंडी नदीवरील ९.५० मीटरचा व ५ गाळ्यांच्या पुलाचे बांधकाम १९९२ साली झाले होते. दोन वर्षापूर्वी या पुलाची डागडुजी करण्यात आली होती, मात्र जुलै २०२३ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे या पुलावरून पाणी जाऊन पूल पूर्णपणे बुडाला होता.

या पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट हे २९ एप्रिल २०२४ मध्ये करण्यात आले होते, त्यात हा पूल कमकुवत झाल्याचे स्पष्ट झाले. यावर्षी या पुलाची दुरुस्ती तथा नवीन बांधकाम न झाल्याने पुलावरून अवजड वाहतूक १८ जूनपासून ते १७जुलैपर्यंत बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जव्हार बाजूकडून पुढे जाण्याकरिता चालतवग्रमार्गे सायवन-ओझर या मार्गाने व जव्हार बाजूकडे येताना वावर वांगणी माळधर-खंडीपाडा या मार्गाने प्रवास करता येणार आहे.

भातसा नदीवरील पूल डळमळीतशहापूर-किन्हवली-मुरबाड रस्त्यावरील सापगावजवळील भातसा नदीवरील पूल धोकादायक स्थितीत आहे. वारंवार डांबरीकरण आणि काँक्रिटीकरण करून या पुलाचा खालचा भाग कोसळला असून, काही भाग खचला आहे. या पुलावरून कर्जत, मुरबाड, अहमदनगर, जेएनपीए येथून येणान्या अवजड वाहनांची वर्दळ सुरू असते. नवीन पूल बांधण्याची मागणी गेल्या पाच वर्षांपासून नागरिक करीत आहेत. निविदा प्रक्रिया झाली आहे; परंतु काम रखडले आहे. भातसा धरणातून पाण्याचा विसर्ग होतो तेव्हा हा पूल पाण्याखाली जातो. नवीन पूल मंजूर आहे; पण कामाला अद्याप सुरुवात झालेली नाही. प्रशासन पूल कोसळण्याची वाट बघत आहे का, असा सवाल माजी बांधकाम आणि आरोग्य सभापती वंदना भांडे यांनी केला.

नांदगाव पूल कमकुवतसार्वजनिक बांधकाम विभागाने धोकादायक घोषित केलेले हे पूल वास्तविक पाहता तोडणे गरजेचे असताना नऊ वर्षे है पूल सुरूच आहेत. पनवेल तालुक्यात नावडे, नांदगाव हे पूलदेखील थोकादायक स्थितीत आहेत. पावसाळ्यात नदी दुतर्फा वाहू लागताच या पुलापर्यंत पाणी येते. काही वेळेला अतिवृष्टीत नांदगाव पूल पाण्याखाली जातो. अशावेळेला या पुलावरून वाहतूक करणारी वाहने पाण्यात वाहून जाण्याची भीती आहे. कोकणाचा भाग असल्याने पनवेलमध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होत असते. अशावेळी अपघाताची भीती अधिक असल्याने प्रशासनाने पावसाळ्याच्या तोंडावर सतर्कता बाळगावी, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :palgharपालघरMaharashtraमहाराष्ट्रTrafficवाहतूक कोंडी