देहूतील पूल आजपासून बंद
By Admin | Updated: August 5, 2016 01:18 IST2016-08-05T01:18:04+5:302016-08-05T01:18:04+5:30
इंद्रायणी नदीवरील ६० वर्षांपूर्वी बांधण्यात आलेला पूल वाहतुकीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने गुरुवारी पावसाळ्यापुरता बंद केला

देहूतील पूल आजपासून बंद
कोल्हापूर : राजघराण्यांशी निगडित असलेली मानाच्या वस्त्रांची परंपरा किंवा पद्धती केवळ मध्ययुगापुरती मर्यादित नसून प्राचीन काळापासून चालत आल्याचे दिसते. त्याचा संबंध राजनिष्ठेशी असून भारतापासून मध्य आशियापर्यंत त्याचे संदर्भ आढळून येतात, असे प्रतिपादन अमेरिकेतील मिशिगन विद्यापीठाचे प्रा. स्टुअर्ट गॉर्डन यांनी गुरुवारी येथे केले.
केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या ‘ग्यान’ उपक्रमांतर्गत शिवाजी विद्यापीठाच्या इतिहास अधिविभागामार्फत विद्यापीठाच्या व्हर्च्युअल क्लासरूममध्ये आयोजित ‘अठराव्या शतकातील दख्खन’ या विषयावरील कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे होते.
ते म्हणाले, शिवाजी महाराजांच्या इतिहासाकडे वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिले पाहिजे. इतिहासाकडे पाहताना समग्र दृष्टीने पाहण्याबरोबरच इतिहास समजून घेण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर केला पाहिजे. इतिहासाच्या विद्यार्थ्यांनी प्रथम वर्तमानकाळ समजून घेणे आवश्यक आहे. परदेशी अभ्यासकांनी वैज्ञानिक दृष्टीने इतिहासाचे संशोधन केले. त्यामुळे आपण त्यांच्याकडे कुतूहलाने, आदराने पाहतो.
‘ग्यान’चे समन्वयक डॉ. आर. के. कामत यांनी स्वागत केले. डॉ. अवनीश पाटील यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. इतिहास विभागप्रमुख डॉ. पद्मजा पाटील यांनी कार्यशाळेचे महत्त्व विशद केले. यावेळी ज्येष्ठ संपादक दशरथ पारेकर यांच्यासह संजय पाटील, जगदीश पाटील, शिक्षक व संशोधक विद्यार्र्थी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
प्रतिष्ठा : मिठाला जागण्याची परंपरा मध्य आशियामध्येही प्रचलित
भारतभूमीमध्ये जात, धर्म यापेक्षाही मिठाला जागणे ही अत्यंत प्रतिष्ठेची गोष्ट मानली जात. आपल्या मातीशी एकनिष्ठ, इमानी राहण्यासाठी सैनिकांना मीठ देऊन शपथ दिली जात असे.
ही मिठाला जागण्याची परंपरा केवळ मध्ययुगीन भारतातच नव्हे, तर मध्य आशियामध्येही प्रचलित असल्याचे दिसते, असे प्रा. गॉर्डन म्हणाले.
‘बाबरनामा’मध्येही पराभूत सैनिकांना आपल्या सैन्यात नव्याने प्रवेश देताना मिठाला जागण्याची शपथ देण्याची परंपरा प्रचलित असल्याचे संदर्भ मिळतात.
मिर्झाराजे जयसिंग, शहाजी महाराज, शिवाजी महाराज, राजाराम महाराज यांच्या काळातील मीठाच्या संदर्भातील अनेक उदाहरणे त्यांनी दिली.
इतिहासाकडे पाहताना समग्र दृष्टीने पाहण्याबरोबरच इतिहास समजून घेण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर केला पाहिजे.
इतिहासाच्या विद्यार्थ्यांनी प्रथम वर्तमानकाळ समजून घेणे आवश्यक आहे. परदेशी अभ्यासकांनी वैज्ञानिक दृष्टीने संशोधन केले. त्यामुळे आपण त्यांच्याकडे आदराने पाहतो, असे शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू
डॉ. देवानंद शिंदे म्हणाले.
महाड दुर्घटनेतील कांबळे यांच्यावर अंत्यसंस्कार
सावर्डेवर शोककळा : बेपत्ता मुलाकडे लक्ष
कुंभोज : रायगड जिल्ह्यातील सावित्री नदीवरील पूल कोसळून झालेल्या अपघातात वाहून गेलेले एस.टी. चालक श्रीकांत शामराव कांबळे यांच्यावर हातकणंगले तालुक्यातील सावर्डे गावी गुरुवारी सायंकाळी ६.३० वाजता शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. तथापि, त्यांचा बेपत्ता मुलगा महेंद्र याचा अद्यापही शोध न लागल्याने गावावर शोककळा पसरलेली आहे.
एस.टी. चालक श्रीकांत कांबळे व त्यांच्या मुलाच्या अपघाताची बातमी कळताच सावर्डेतील ५० पेक्षा अधिक नातेवाइकांनी बुधवारी महाड गाठले. तिथे या सर्वांनी रात्र जागून काढली. गुरुवारी पहाटे श्रीकांत यांचा मृतदेह आढळून आला. दुपारी दीड वाजता दापोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात मिळाला. त्यानंतर सायंकाळी ६.३० वाजता सावर्डेतील बौद्धनगराशेजारील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यविधीस पी. टी. कांबळे, संपत कांबळे, गौतम कांबळे, वसंत कांबळे, महेश कांबळे, भागवत कांबळे, बौद्धनगरातील नातेवाईक व ग्रामस्थ उपस्थित होते.