तरुणीचे विवस्त्र फोटो भावी पतीला पाठवून मोडले लग्न !

By Admin | Updated: June 8, 2017 03:47 IST2017-06-08T03:47:16+5:302017-06-08T03:47:16+5:30

विवस्त्र फोटो व खोट्या चिठ्ठ्या पाठवून तिचे लग्न मोडणाऱ्या आणि त्याला चिथावणी देणाऱ्या त्याच्या कुटुंबीयांविरोधात खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला

Bride's biennial photo sent by the future husband! | तरुणीचे विवस्त्र फोटो भावी पतीला पाठवून मोडले लग्न !

तरुणीचे विवस्त्र फोटो भावी पतीला पाठवून मोडले लग्न !

लोकमत न्यूज नेटवर्क
कल्याण : एका २२ वर्षांच्या तरुणीवर बलात्कार करून तिच्या भावी पतीला तिचे विवस्त्र फोटो व खोट्या चिठ्ठ्या पाठवून तिचे लग्न मोडणाऱ्या आणि त्याला चिथावणी देणाऱ्या त्याच्या कुटुंबीयांविरोधात खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
पश्चिमेतील चिकणघर परिसरात ही तरुणी कुटुंबासह राहते. डिसेंबर २०१६ मध्ये तिच्या घरात कोणीही नसल्याची संधी साधत नितेश जोशी घरात घुसला. तेथे त्याने तिच्यावर बलात्कार केला. त्या वेळी त्याने तिची विवस्त्र क्लिपही काढली.
या प्रकाराबाबत कुणाला सांगितल्यास भाऊ आणि वडिलांना कायमचे
गायब करण्याची धमकी त्याने तिला दिली.
आपल्या मुलाच्या या विकृत कृत्याची जोशी कुटुंबाला माहिती असतानाही त्याला विरोध करण्याऐवजी चिथावणी देत उलट त्या तरुणीलाच तिची क्लिप व्हायरल करण्याची धमकी दिली. कुटुंबीयांच्या जीवाला धोका होईल, म्हणून ती तरुणी शांत बसली.
दरम्यान, तिचे लग्न ठरल्याचे समजताच विकृत जोशी कुटुंबाने तिच्या भावी पतीकडे तिचे विवस्त्र फोटो आणि खोट्या चिठ्ठ्या पाठवल्या. त्यामुळे तिचे जमलेले लग्न मोडले.
तरु णीची आणि तिच्या कुटुंबाची बदनामी झाल्याने तिने धाडस करू न याप्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद नोंदवली. त्यानुसार, पोलिसांनी नितेश जोशी, त्याचे वडील झंपू जोशी, आई भामा जोशी, भाऊ विनोद जोशी या चौघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक व्ही.एस. पवार करत आहेत.

Web Title: Bride's biennial photo sent by the future husband!