शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

अक्षता पडायच्या बाकी होत्या, नववधू मंडपात म्हणाली, ‘ह्यो नवरा नको गं बाई’  ...अन् नवरदेव गेला परत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2022 09:32 IST

bride refuses marriage groom चिमूर तालुक्यातील कोलारी येथील घटना, नातेवाईकांनी तिची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. दुपारचे चार वाजले तरी नववधू लग्नमंडपी आली नाही. त्यामुळे नवरदेवाकडील वऱ्हाडींमध्ये कुजबुज सुरू झाली.

- अमोद गौरकारलोकमत न्यूज नेटवर्कशंकरपूर (जि. चंद्रपूर) : बँडबाजाच्या पथकात नाचत, वाजत-गाजत नवरदेव लग्नमंडपी आला; परंतु ऐनवेळी भरमंडपात वधू मुलीने लग्नास नकार दिल्याने अखेर नवरदेवाला आल्या पावली परत जावे लागले. ही घटना चिमूर तालुक्यातील शंकरपूरजवळील कोलारी येथे मंगळवारी रात्री घडली.

चिमूर तालुक्यातील उसेगाव येथील एका युवकाचे नागपूर येथील एका मुलीसोबत लग्न जुळले. थाटामाटात साक्षगंधही झाले. मुलीच्या आजोळी कोलारी येथे लग्नकार्य उरकायचे असे बैठकीत ठरले. त्यानुसार कोलारी येथे मंगळवारी लग्न होणार होते. त्यासाठी नवरदेवही उसेगाववरून वऱ्हाडी घेऊन लग्नमंडपी हजर झाला. ढोल-ताशाच्या गजरात आणि मित्रमंडळीच्या नाच-गाण्याच्या तालावर नवरदेवाची एन्ट्री झाली. नवरी मुलगीही मंडपी आली. आता मंगलाष्टके होणार इतक्यात मंडपातच मुलीला चक्कर आल्याने ती खाली पडली. त्यामुळे लगेचच तिला दवाखान्यात नेण्यात आले. दवाखान्यात शुद्धीवर आल्यानंतर नववधूने लग्नमंडपी जाण्यास नकार दिला आणि मला त्या मुलाशी लग्न करायचंच नाही, असे स्पष्टपणे घरच्या मंडळींना सांगितले.

नातेवाईकांनी तिची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. दुपारचे चार वाजले तरी नववधू लग्नमंडपी आली नाही. त्यामुळे नवरदेवाकडील वऱ्हाडींमध्ये कुजबुज सुरू झाली. अखेर नवरीच्या नातेवाईकांकडून मुलीचा लग्नास नकार आहे, असे स्पष्टपणे कळवले. त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले. नवऱ्या मुलाने यावर तोडगा काढावा म्हणून तंटामुक्तीकडे अर्ज सादर केला. तंटामुक्तीच्या सभेत मुलीने लग्न करण्यास स्पष्टपणे नकार दिल्याने नवरदेवाला परत फिरावे लागले.

जेवणावळी आणि आंदणलग्न कार्य असल्याने वऱ्हाडींसाठी स्वयंपाक बनविला होता; परंतु लग्न कार्य होणार नसल्याने जेवण तरी कसे करावे, असा प्रश्न निर्माण झाला, परंतु अन्न हे पूर्ण ब्रह्म असल्याने अखेर वऱ्हाडींनी जेवण केले. गावातील लोकांनी व नातेवाईकांनी मुलीच्या सुखी संसारासाठी आणलेल्या भेटवस्तू नातेवाईकांना परत न्याव्या लागल्या.

टॅग्स :marriageलग्न