बीडमध्ये सापडलेल्या विटा चांदीच्या!

By Admin | Updated: December 6, 2015 02:37 IST2015-12-06T02:37:34+5:302015-12-06T02:37:34+5:30

येथील पेठ बीड भागातील महावीर चौक परिसरातील मोकळ््या जागेवर शुक्रवारी दुपारी बांधकामासाठी पाया खोदत असताना सापडलेल्या दोन विटा चांदीच्या असल्याचे शनिवारी

Bricks found in bead silver! | बीडमध्ये सापडलेल्या विटा चांदीच्या!

बीडमध्ये सापडलेल्या विटा चांदीच्या!

बीड : येथील पेठ बीड भागातील महावीर चौक परिसरातील मोकळ््या जागेवर शुक्रवारी दुपारी बांधकामासाठी पाया खोदत असताना सापडलेल्या दोन विटा चांदीच्या असल्याचे शनिवारी स्पष्ट झाले. त्यांचे वजन १५ किलो ५७७ ग्रॅम असून त्यांची किंमत ५ लाख ४५ हजार रुपये असल्याचे पोलीस निरीक्षक बी. डी. पावरा यांनी सांगितले.
पाया खोदताना मजुरांना या दोन विटा सापडल्या होत्या. जागामालक गणेश पत्रावळे व मजुरांमध्ये वाटाघाटीवरुन वाद झाला होता. त्यानंतर अशोक क्षीरसागर याने पत्रावळे यांच्या हातातील एक वीट हिसकावून पलायन केले. नंतर त्याने मोबाईल बंद केला. पोलिसांनी पत्रावळे यांच्या भावाकडून एक वीट शुक्रवारी हस्तगत केली तर दुसरी वीट क्षीरसागर याने रात्री उशीरा पोलिसांच्या हवाली केली. या विटांची तपासणी झाल्यानंतर त्या चांदीच्या असल्याचे स्पष्ट झाले.

Web Title: Bricks found in bead silver!