कोल्हापूरच्या लाचखोर महापौरांना अखेर अटक
By Admin | Updated: February 5, 2015 10:25 IST2015-02-05T10:09:57+5:302015-02-05T10:25:37+5:30
लाच घेताना रंगेहाथ पकडल्या गेलेल्या कोल्हापूरच्या महापौर तृप्ती माळवी यांना अखेर अटक करण्यात आली आहे.

कोल्हापूरच्या लाचखोर महापौरांना अखेर अटक
>ऑनलाइन लोकमत
कोल्हापूर, दि. ५ - लाच घेताना रंगेहाथ पकडल्या गेलेल्या कोल्हापूरच्या महापौर तृप्ती माळवी यांना अखेर अटक करण्यात आली आहे. रक्तदाब वाढल्याने रुग्णालयात दाखल झालेल्या माळवींना आजा डिस्चार्ज मिळाला आणि त्यांना तत्काळ अटक करण्यात आली. आज दुपारी त्यांना कोर्टासमोर हजर करण्यात येईल.
एका जागेच्या प्रकरणात तृप्ती माळवी व त्यांचा सहकारी अश्वीन गडकरी लाच घेणार असल्याचे लाचलुचपत प्रतिबंध विभागाला कळाले असता, गेल्या आठवड्यात शुक्रवारी सापळा रचून त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले होते. गडकरी यास अटक झाल्यावर न्यायालयाने जामीनावर सुटका केली. परंतू, गुन्हा दाखल झाला त्यावेळी रात्र असल्याने कायदेशीर बाबींनुसार तृप्ती यांना अटक करता आली नाही. या घटनेनंतर महापौर तृप्ती माळवी यांचा रक्तदाब वाढल्याने रुग्णालयात दाखल झाल्या होत्या. अखेर त्यांना आज जिस्चार्ज दिला व पोलिसांना त्यांना अटक केली
महापौर माळवी यांना लाच घेताना पकडल्याची माहिती संपूर्ण शहरात वा-यासारखी पसरली. महापौर कार्यालयातील सर्व कर्मचारी तर या कारवाईवेळी अक्षरश: पळून गेले.या कारवाईमुळे संपूर्ण महापालिकेवर भीतीची छाया होती. आतापर्यंत काही अधिकारी लाच घेताना पकडले गेले असले तरी त्यांच्यावरील कारवाई ही महापालिकेच्या बाहेर झाली होती; परंतु ही कारवाई चक्क महापालिकेच्या कार्यालयात झाल्यामुळे संपूर्ण महापालिका हादरली.