लाचखोर मंडळ अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

By Admin | Updated: May 22, 2016 04:02 IST2016-05-22T04:02:03+5:302016-05-22T04:02:03+5:30

क्षमतपेक्षा अधिक रेती वाहून नेणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई न करता सोडून देण्यासाठी लाच मागणारा मंडळ अधिकारी लाचलुतपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) जाळ्यात अडकला

Bribery Board Officer ACB net | लाचखोर मंडळ अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

लाचखोर मंडळ अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

अमरावती : क्षमतपेक्षा अधिक रेती वाहून नेणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई न करता सोडून देण्यासाठी लाच मागणारा मंडळ अधिकारी लाचलुतपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) जाळ्यात अडकला. शुक्रवारी रात्री नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील लोणी (टाकळी) येथील एका ढाब्यावर पाच हजारांची लाच घेताना त्याला रंगेहात पडकण्यात आले. अशोक दौलत मनवर (५२) या अधिकाऱ्याचे नाव आहे. गुरुवारी ट्रॅक्टरचालकाने खापरवाडा येथील पेढी नदीतून रेती भरली आणि ती घेऊन ट्रॅक्टरचालक हिवरा फाटा येथे रॉयल्टी घेण्यासाठी गेला. मात्र, माना व निंबा सर्कलचा मंडळ अधिकारी अशोक मनवर याने रेती क्षमतेपेक्षा अधिक असल्याचे सांगून कारवाई न करण्यासाठी पाच हजार रुपयांची मागणी केली. शुक्रवारी लोणीजवळील एका ढाब्यावर हा व्यवहार करण्याचे ठरले. यासंदभात ट्रॅक्टरचालकाने एसीबीकडे तक्रार केली. त्यानुसार शुक्रवारी रात्री एसीबीने सापळा रचून मनवरला लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. (प्रतिनिधी)

Web Title: Bribery Board Officer ACB net

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.