मंत्रालयात लाचखोर लिपिकाला अटक
By Admin | Updated: May 9, 2015 02:14 IST2015-05-09T02:14:56+5:302015-05-09T02:14:56+5:30
राज्याच्या गृह विभागातील भीमसेन देवनाथ तांडेल या लिपिकाला ५ हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी मंत्रालयातच रंगेहाथ

मंत्रालयात लाचखोर लिपिकाला अटक
मुंबई : राज्याच्या गृह विभागातील भीमसेन देवनाथ तांडेल या लिपिकाला ५ हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी मंत्रालयातच रंगेहाथ अटक केली आहे. सुरक्षा परवान्यासाठी तांडेलने एका सुरक्षा रक्षक कंपनीकडे लाच मागितली होती. त्यावर प्राप्त झालेल्या तक्रारीवर एसीबीने ही कारवाई केली.
कोपरखैरणे येथे कार्यालय
असलेल्या स्टाईल सोल्जर सिक्युरिटी प्रोटेक्शन या एजन्सीच्या मालकांनी
राज्य शासनाच्या सुरक्षा परवान्यासाठी अर्ज केला होता. मात्र फाईल पुढे सरकविण्यासाठी तांडेल याने १० हजार रुपयांची मागणी केली होती. त्यानंतर ५ हजार रुपयांवर त्याने फाईल पुढे सरकविण्यास तयारी दर्शवली. मालकाच्या तक्रारीनंतर एसीबीने सापळा रचून तांडेल याला रंगेहाथ अटक केली.