लाचखोर बांधकाम सभापती गजाआड
By Admin | Updated: September 10, 2014 02:56 IST2014-09-10T02:56:29+5:302014-09-10T02:56:29+5:30
१ लाख ५० हजार रुपयांची लाच घेतल्या प्रकरणी नवी मुंबईच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले.

लाचखोर बांधकाम सभापती गजाआड
अलिबाग : रायगड जिल्हा परिषेदेचे बांधकाम सभापती व कर्जत तालुक्यातील शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य उत्तम चंदू कोळंबे यांच्यासह जिल्हा परिषद बांधकाम विभागातील वरिष्ठ सहाय्यक हेमंत चिंतामण म्हात्रे व विस्तार अधिकारी प्रसाद गोपीनाथ माळी या तिघांना १ लाख ५० हजार रुपयांची लाच घेतल्या प्रकरणी नवी मुंबईच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले.
कोळंबे यांच्या या लाच मागणी प्रकरणातील तक्रारदार यांना धोका असल्याने त्यांचे नाव सांगण्यास नकार देवून, ही कारवाई करणारे नवी मुंबईच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उप अधिक्षक विवेक जोशी यांनी या गुन्ह्याची माहिती दिली. (विशेष प्रतिनिधी)