ओल्या बाळंतीणीला बेदम मारहाण
By Admin | Updated: January 26, 2015 04:17 IST2015-01-26T04:17:38+5:302015-01-26T04:17:38+5:30
पैशांसाठी ओल्या बाळंतीणीस लाथा-बुक्क्याने बेदम मारहाण करणाऱ्या नराधम पतीविरुद्ध सांगलीत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ओल्या बाळंतीणीला बेदम मारहाण
सांगली : पैशांसाठी ओल्या बाळंतीणीस लाथा-बुक्क्याने बेदम मारहाण करणाऱ्या नराधम पतीविरुद्ध सांगलीत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर पळून गेलेल्या पतीचा पोलीस शोध घेत आहेत.
यशवंतनगर येथील वसंतदादा कुस्ती केंद्रासमोर हा प्रकार नुकताच घडला. मुंबईतील सायन येथे राहणाऱ्या वर्षा (२२) हिचा दीड वर्षापूर्वी रवींद्र गणपती शेंडगे (३१) याच्याशी विवाह झाला होता. तीन महिन्यांपूर्वी वर्षाने बाळाला जन्म दिला. वर्षापूर्वी वडिलांचे अपघाती निधन झाल्याने विम्याचे पैसे तिला मिळाले आहेत. हे पैसे मला दे, असा तगादा रवींद्रने लावला होता. मात्र वर्षाने पैसे देण्यास नकार दिला. यातून त्यांच्यात भांडण सुरू होते.
१६ जानेवारीला या पैशांवरून दोघांचे पुन्हा भांडण झाले. त्यावेळी रवींद्रने शिवीगाळ करीत वर्षाला लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. त्यात सिझरचे टाके तुटल्याने रक्तस्राव होऊन वर्षा गंभीर जखमी झाली. तिने आई मंगल मधुकर पांडे हिला घडला प्रकार सांगितला. तेव्हा आईने वर्षाला मुंबईस नेले व सायनमधील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. तसेच त्यांनी जावयाविरोधातही संजयनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली.