शरीरावर व्रण, विषाचा दर्प

By Admin | Updated: September 12, 2014 00:50 IST2014-09-12T00:50:11+5:302014-09-12T00:50:11+5:30

सोनाली अतिदक्षता विभागात बेशुद्धावस्थेत होती. तिच्या गळ्यावर, खांद्यावर, छातीजवळ आणि डाव्या हातावर निळसर डाग (व्रण) टिपले दाम्पत्याला दिसले. सोनालीला काय झाले, असे त्यांनी जावयाकडे विचारले असता,

Breathing on the body, scouring of poison | शरीरावर व्रण, विषाचा दर्प

शरीरावर व्रण, विषाचा दर्प

नागपूर : सोनाली अतिदक्षता विभागात बेशुद्धावस्थेत होती. तिच्या गळ्यावर, खांद्यावर, छातीजवळ आणि डाव्या हातावर निळसर डाग (व्रण) टिपले दाम्पत्याला दिसले. सोनालीला काय झाले, असे त्यांनी जावयाकडे विचारले असता, सोनाली सारख्या ओकाऱ्या करीत होती, त्यामुळे तिला रुग्णालयात दाखल केल्याचे अमोलने सांगितले. तिच्या नाका-तोंडातून विषाचा उग्र दर्प येत असल्यामुळे तिने विष घेतले असावे, असा संशय सोनालीच्या आईवडिलांना आला. दरम्यान, १० सप्टेंबरच्या सकाळी ५.१५ ला डॉक्टरांनी सोनालीला मृत घोषित केले. लग्नाला तीन महिने पूर्ण व्हायचे असतानाच मुलीचा असा अंत झाल्यामुळे टिपले परिवाराला जबर मानसिक धक्का बसला.
विष पाजून ठार मारल्याचा आरोप
जावई अमोल याच्याकडून समाधानकारक माहिती मिळत नसल्यामुळे त्याने आणि त्याच्या नातेवाईकांनी सोनालीला मारहाण करून, विष पाजून ठार मारले असावे, असा संशय सोनालीच्या वडिलांना आला.
लकडगंज पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीतून शंकरराव टिपले यांनी जावई अमोल बोरकर, त्याचा भाऊ राधेश्याम आणि आई रेखाबाई पांडुरंग बोरकर या तिघांनी संगनमत करून सोनालीला मारहाण केली आणि विष पाजून ठार मारले, असे तक्रारीत म्हटले आहे. यावरून लकडगंजचे पीएसआय आनल दास यांनी कलम ४९८ (अ), ३२८, ३०४ (ब), ३४ अन्वये गुन्हे उपरोक्त तिघांवर गुन्हे दाखल केले.(प्रतिनिधी)
आईला अखेरचे निमंत्रण
६ सप्टेंबरला सोनालीकडे कार्यक्रम होता. त्याची खरेदी करण्यासाठी ती भांडेप्लॉटकडे आली होती. यावेळी ती आईच्या घरी आली. आज (६ सप्टेंबर) आमच्याकडे कार्यक्रम आहे. तुम्ही सर्वजण या, असे निमंत्रण तिने आई कमलाबार्इंना दिले. प्रकृती चांगली नसल्यामुळे कमलाबाई तिच्याकडे जाऊ शकली नाही. तीन दिवसानंतर कमलाबाईला दुसरा निरोप मिळाला. धावपळ करीत त्या पतीसोबत रुग्णालयात पोहचल्या. यावेळी सोनाली मृत्युशय्येवर होती. तिच्याशी संवाद करण्याचीही कमलाबार्इंना संधी मिळाली नाही. दुसऱ्या दिवशी (१० सप्टेंबर) सोनालीचा मृत्यू झाला. तिने ६ सप्टेंबरला आपल्या आईला दिलेले निमंत्रण अखेरचे ठरले. मुलीच्या निमंत्रणाला मान दिला नाही, याचे शल्य कमलाबाई यांना आता आयुष्यभर बोचणार आहे.

Web Title: Breathing on the body, scouring of poison

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.