पहिल्या सहा महिन्यांतील स्तनपान बाळासोबतच आईलाही ठरते वरदान
By Admin | Updated: August 3, 2014 01:01 IST2014-08-03T01:01:30+5:302014-08-03T01:01:30+5:30
बाळ जन्माला आल्यावर पहिल्या तासात बाळाला आईचे दूध पाजले पाहिजे, याचबरोबरीने सहा महिन्यांर्पयत बाळाला फक्त आईचे दूधच दिले पाहिजे,

पहिल्या सहा महिन्यांतील स्तनपान बाळासोबतच आईलाही ठरते वरदान
पूजा दामले - मुंबई
बाळ जन्माला आल्यावर पहिल्या तासात बाळाला आईचे दूध पाजले पाहिजे, याचबरोबरीने सहा महिन्यांर्पयत बाळाला फक्त आईचे दूधच दिले पाहिजे, स्तनपान हा बाळाचा हक्क आहे. मात्र अनेक कारणो सांगून महिला बाळांना सहा महिन्यांर्पयत स्तनपान करीत नाहीत, हे बाळाच्या आणि आईच्या आरोग्यास हानिकारक असल्याचे डॉक्टरांचे म्हणणो आहे.
शासकीय, निमशासकीय कार्यालयांमध्ये नोकरी करीत असणा:या महिलांना बाळ झाल्यावर सहा महिन्यांची रजा मिळते, मात्र तरीही अनेक महिला तीन महिन्यांर्पयतच बाळाला दूध पाजतात. यानंतर विकतचे दूध त्या बाळांना देतात. या कालावधीत आईचे दूधच बाळांसाठी पोषक असते. आईचे दूध बाळासाठी कवचकुंडलाचे काम करते. आईला झालेल्या साथीच्या आजारांमुळे तिच्या शरीरातील रोगप्रतिकारकशक्ती वाढलेली असते. दुधामधून बाळालाही ही पोषक द्रव्ये मिळतात. यामुळे आईचे दूध हे बाळाचे पहिले लसीकरण समजले जाते, असे जे.जे. रुग्णालयाच्या प्रसूती आणि स्त्रीरोग विभागाच्या प्रमुख डॉ. रेखा डावर यांनी सांगितले.
अनेक सुशिक्षित महिला बाळांसाठी महागडे पॅक्ड बंद दूध घेतात. बाळांना हवी असलेली पोषक द्रव्ये इतके पैसे खर्च करून मिळतात असा त्यांचा समज असतो. या दुधातून बाळांना पोषक द्रव्ये मिळत असली तरी आईच्या दुधाची गुणवत्ता त्यात नसते. बाळाला दूध पाजताना आईचा होणारा स्पर्श, त्यातून वाढणारे प्रेम, आईच्या दुधामुळे मुलांची शारीरिक - मानसिक वाढ चांगली होते, मात्र विकतच्या दुधातून हे काहीच बाळांना मिळत नाही. आईच्या दुधामुळे मुलांची बौद्धिक क्षमताही चांगली होते, रोगप्रतिकारकशक्ती वाढते. सध्याच्या काळात मधुमेह, अस्थमासारखे आजार मोठय़ा प्रमाणात वाढत आहेत. मात्र मुलांना सहा महिने आईचे दूध दिले आणि पुढे वर्षभर मुलांना दूध मिळाल्यास हे आजार होण्याची शक्यता कमी होते. कारण लहानपणापासूनच मुलांची रोगप्रतिकारकशक्ती चांगली असते.
4क् ते 5क् वयोगटातील महिलांना होणा:या कर्करोगामध्ये स्तनाचा आणि गर्भाशयाचा कर्करोग होण्याचे प्रमाण जास्त आहे. मात्र जर का महिलेने सहा महिन्यांर्पयत बाळाला दूध पाजले तर तिला या दोन्ही प्रकारचे कर्करोग होण्याचा धोका कमी होतो. अनेक महिला आपला सुडौल बांधा जपण्यासाठी जास्त काळ स्तनपान करीत नाहीत. स्तनपान केल्यास बांधा सुडौल होतो. कारण दूधनिर्मिती होताना त्यात अनेक कॅलरीज्चा वापर होतो. जिम, डाएट करून बारीक होण्यापेक्षा स्तनपानामुळेही त्यांना सुडौल बांधा मिळू शकतो, असे डॉ. डावर यांनी सांगितले.
कार्यालयामध्ये पाळणाघर असले पाहिजे. यामुळे आई नोकरी करत असली तरी बाळाकडे तिला लक्ष देणो, त्याला दूध पाजणो सहज शक्य होईल. यामुळे आईची आणि बाळाची प्रकृतीही चांगली राहील.
ब्रेस्ट फिडिंग विनिंग गोल फॉर लाइफ हे यंदाच्या स्तनपान सप्ताहाचे घोषवाक्य आहे. हे घोषवाक्य वल्र्ड अलायन्स फॉर ब्रेस्ट फिडिंग अॅक्शन या संस्थेने जाहीर केले आहे.
नोकरी करूनही बाळाला दूध पाजू शकता
1काही महिलांना त्यांच्या आर्थिक परिस्थितीमुळे नोकरी करण्याशिवाय पर्याय नसतो. मात्र त्याही महिला बाळाला दूध पाजू शकतात. नोकरीचे कारण पुढे करून स्तनपान बंद करण्याची आवश्यकता नाही.
2सकाळी लवकर उठून आणि ऑफिसला जायच्या आधी बाळाला दूध त्या पाजू शकतात. यानंतर आईने दूध काढून ठेवले तर सामान्य तापमानाला आठ तास चांगले राहते. फक्त दूध ठेवायचे भांडे स्वच्छ असले पाहिजे आणि जी व्यक्ती बाळाला दूध पाजणार आहे त्या व्यक्तीचे हात स्वच्छ असले पाहिजेत.
3हे दूध पाजताना बाळाला चमच्यानेच पाजावे. आठ तासांपेक्षा अधिक काळ लागणार असल्यास फ्रीजमध्ये ठेवू शकता. मात्र बाहेर काढल्यावर ते तापवू नये. नाहीतर ते खराब होते. बाळाला कधीही बाटलीने दूध पाजू नये, असे डॉ. डावर यांनी सांगितले.