साखरपुड्यापूर्वी घरात सिलिंडरचा स्फोट, 16 वर्षीय मुलीचा होरपळून मृत्यू
By Admin | Updated: May 9, 2017 11:33 IST2017-05-09T10:22:45+5:302017-05-09T11:33:28+5:30
वाशिम शहरातील दत्तनगरमध्ये मानवतकर कुटुंबीयांच्या घरात सिलिंडरचा स्फोट होऊन संपूर्ण घर जळून खाक झाले आहे.

साखरपुड्यापूर्वी घरात सिलिंडरचा स्फोट, 16 वर्षीय मुलीचा होरपळून मृत्यू
ऑनलाइन लोकमत
वाशिम, दि. 9 - वाशिम शहरातील दत्तनगरमध्ये मानवतकर कुटुंबीयांच्या घरात सिलिंडरचा स्फोट होऊन संपूर्ण घर जळून खाक झाले आहे. मंगळवारी सकाळी (9 मे) सकाळी 7 वाजता ही दुर्घटना घडली आहे. यात 16 वर्षीय मुलीचा होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
मानवतकर कुटुंबीयांच्या घरातील मुलाचा साखरपुडा असल्यानं जवळपास 20 ते 25 नातेवाईक जमले होते. मंगल कार्य असलेल्या या कुटुंबावर आता दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
नातेवाईकांसाठी सकाळी न्याहरीची तयारी सुरू असताना अचानक सिलिंडरचा स्फोट झाला. यानंतर सर्व नातेवाईक जीव वाचवण्यासाठी घराबाहेर धावले. मात्र 16 वर्षांची मुलगी घरातच अडकली व दुर्घटनेत तिचा होरपळून मृत्यू झाला. मृत पावलेली मुलगी ही साखरपुडा असलेल्या मुलाची धाकटी बहीण होती.
सिलिंडरमधील लिकेजमुळे स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या घटनेत कुटुंबीयांचं जवळपास 3 लाख रुपयांचंही नुकसान झाले आहे.