पेंटाग्राफ तुटल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

By Admin | Updated: July 3, 2017 14:23 IST2017-07-03T14:23:16+5:302017-07-03T14:23:16+5:30

मध्यरेल्वे मार्गावरुन रेल्वे प्रवास करणा-या प्रवाशांना मागच्या काही दिवसांपासून सातत्याने मनस्तापाचा अनुभव येत आहे.

The breakdown of the pentagram disrupts the movement of the Central Railway | पेंटाग्राफ तुटल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

पेंटाग्राफ तुटल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

 ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. 3 - मध्यरेल्वे मार्गावरुन रेल्वे प्रवास करणा-या प्रवाशांना मागच्या काही दिवसांपासून सातत्याने मनस्तापाचा अनुभव येत आहे. सोमवारी आठवडयाच्या पहिल्याच दिवशी माटुंग्याजवळ लोकलचा पेंटाग्राफ तुटल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. 
 
या मार्गावर गाडया अर्धातास उशिराने धावत आहेत. डाऊनच्या दिशेने गाडया फास्ट मार्गावर वळवण्यात आल्या आहेत. संध्याकाळपर्यंत वाहतूक पूर्वपदावर येणे आवश्यक आहे. अन्यथा कामावरुन घरी परतणा-या लाखो प्रवाशांचे हाल होतील. 

Web Title: The breakdown of the pentagram disrupts the movement of the Central Railway