ठाण्यात पाईपलाइन फुटून लाखो लीटर पाणी वाया
By Admin | Updated: July 28, 2016 12:03 IST2016-07-28T11:59:31+5:302016-07-28T12:03:19+5:30
ठाण्यातील वर्तकनगर येथे मुंबईला पाणीपुरवठा करणारी पाईपलाइन फुटल्याने लाखो लीटर पाणी वाया गेले.

ठाण्यात पाईपलाइन फुटून लाखो लीटर पाणी वाया
ऑनलाइन लोकमत
ठाणे, दि. २८ - मुंबईला पाणीपुरवठा करणारी पाईपलाइन फुटल्याने लाखो लीटर पाणी वाया गेले आहे. ठाण्यातील वर्तकनगर येथे ही घटना घडली असून आसपासच्या परिसरात पाणीच पाणी झाले आहे. मुख्य म्हणजे गेल्या वर्षी दहीहंडीच्या वेळेसेही हीच पाईपलाईन फुटल्याने पाण्याची नासाडी झाली होती. संबंधित अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून दुरूस्तीचे काम सुरू आहे.
फोटो : विशाल हळदे