शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

गणेशोत्सवाचे आंतरराष्ट्रीय स्तरावर ब्रँडिंग करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2017 23:09 IST

महाराष्ट्र हे विविध संस्कृतीने नटलेले राज्य असून गणेशोत्सव हा आपल्या संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. देश पातळीवर साजरा होत असलेल्या गणेशोत्सवाचे आंतरराष्ट्रीय पातळीवर ब्रँडिग करण्यासाठी राज्य शासन प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

मुंबई, दि. ५ -  महाराष्ट्र हे विविध संस्कृतीने नटलेले राज्य असून गणेशोत्सव हा आपल्या संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. देश पातळीवर साजरा होत असलेल्या गणेशोत्सवाचे आंतरराष्ट्रीय पातळीवर ब्रँडिग करण्यासाठी राज्य शासन प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.गिरगाव चौपाटी येथे गणेश विसर्जन कार्यक्रमास भेट देऊन तेथील व्यवस्थेची पाहणी मुख्यमंत्र्यानी केली. थायलंडच्या नागरिकांसमवेत मुख्यमंत्र्यानी सपत्निक गणेश आरती केली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.सर्व परदेशी गणेश भक्तांचे स्वागत करुन मुख्यमंत्री म्हणाले, कोणत्याही देशात गेले तरी गणेशाची मुर्ती आपल्यास पाहायला मिळते. चीन,अमेरिका, युरोप, थायलंड,मलेशिया आदी देशामध्ये गणेशोत्सव साजरा होतोय, ही कौतुकाची बाब आहे. महाराष्ट्राच्या संस्कृतीला आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचविण्यासाठी राज्याचा पर्यटन विभाग आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ प्रयत्न करीत आहेत. मुख्यमंत्री श्री, फडणवीस यांनी थायलंडच्या पाहुण्यांचे कौतुक केले, त्यांनी केलेल्या गणेश आरतीने मुख्यमंत्री भावूक झाले. तसेच मुख्यमंत्र्यानी विसर्जनासाठी येणाऱ्या गणेश मूर्तींवर पुष्पवृष्टी केली.यावेळी मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस, मुंबई शहरचे पालकमंत्री सुभाष देसाई, पर्यटनमंत्री जयकुमार रावल, आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत,  मंत्री महादेव जानकर, पर्यटन राज्यमंत्री मदन येरावार, महसूल राज्यमंत्री संजय राठोड, आमदार राज पुरोहित, महापौर विश्वनाथ महाडेश्वर, उपमहापौर हेमांगी वरळीकर, मनपा आयुक्त अजोय मेहता, पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर आदी उपस्थित होते.

टॅग्स :Ganeshotsavगणेशोत्सव