बाप्पासाठी सजली उद्योगनगरी

By Admin | Updated: September 5, 2016 01:46 IST2016-09-05T01:46:38+5:302016-09-05T01:46:38+5:30

आद्यपूजेचा मान असणाऱ्या लाडक्या गणरायाचे सोमवारी उद्योगनगरीत आगमन होत आहे.

Bramble for the Bappa | बाप्पासाठी सजली उद्योगनगरी

बाप्पासाठी सजली उद्योगनगरी


पिंपरी : आद्यपूजेचा मान असणाऱ्या लाडक्या गणरायाचे सोमवारी उद्योगनगरीत आगमन होत आहे. गणरायाच्या स्वागतासाठी
उद्योगनगरी सजली आहे. उत्सवाच्या पूर्वसंध्येला रविवारी पिंपरीतील बाजारपेठेत पूजेचे साहित्य घेण्यासाठी भाविकांची गर्दी जमली होती. ‘...बाप्पा मोरया’च्या जयघोषात गणरायाला घरी आणण्यासाठी भक्तांची लगबग दिसून आली.
गणेशोत्सवाची सुरुवात सोमवारी होत असून, गणेशभक्तांची सजावटीचे साहित्य खरेदी करण्यासाठी बाजारपेठेत लगबग सुरू असून, बाजारपेठा गर्दीने फुलल्या आहेत. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी विविध विषयांवरील देखाव्यांचे नियोजन केले आहे. त्याचबरोबर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांप्रमाणेच घरोघरीही गणेशोत्सवाची लगबग सुरू होती. तसेच सजावटीचे साहित्य खरेदी करण्यासाठी बाजारपेठेत मोठ्या प्रमाणावर गर्दी दिसून आली. पिंपरी, चिंचवडगाव, निगडी, पिंपरीगाव, भोसरी, आकुर्डी, सांगवी, पिंपळे गुरव, वाकड, दापोडी, खडकी, तळवडे, ताथवडे, हिंजवडी परिसरातील बाजारपेठांमध्ये गर्दी झाली होती. तसेच उपनगरातील चौकाचौकांत मूर्तींचे स्टॉल दिसून आले.(प्रतिनिधी)
>प्राणप्रतिष्ठा मुहूर्त दुपारी १़४६ पर्यंत
‘‘गणेश चतुर्थीची प्राणप्रतिष्ठा पुजा सोमवारी सूर्योदय ते मध्यान्ह सकाळी ६़२२ ते दुपारी १़४६ या वेळेत करावी, त्यातही स. ९़३० ते़ दु. १़४६ हा मध्यान्ह व्यापारी मुहूर्त सर्वोत्तम. पहाटे ४ ते ४़३० या वेळेत मंगल अभ्यंग स्नान करुन संध्यावंदन, सूर्यनमस्कार, गायत्री पाठ हे नित्यकर्म करून श्री गणेश प्राणप्रतिष्ठा करावी’’ असे पं़ वसंतराव गाडगीळ यांनी सांगितले़

Web Title: Bramble for the Bappa