शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
2
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
3
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
4
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
5
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
6
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
7
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
8
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
9
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
10
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
11
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
12
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
13
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
14
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
15
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
16
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
17
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
18
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
19
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
20
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका

जगभरात दररोज ५०० जणांना होतो ब्रेन ट्युमर मद्य प्राशन, सिगारेट, तंबाखू सेवनामुळे धोका !

By appasaheb.patil | Updated: June 8, 2019 10:52 IST

World Brain Tumor Day; सोलापुरातील प्रसिध्द न्युरोलॉजिस्ट डॉ़ प्रसन्न कासेगांवकर याच्याशी ‘लोकमत’ ने साधलेला संवाद

ठळक मुद्देब्रेन ट्युमर हा मेंदूच्या कॅन्सरशी संबंधित आजारलहान मुलांसह मोठ्या व्यक्तींना हा आजार होऊ शकतोवेळीच निदान व उपचार केले तर तो बरा होऊ शकतो 

आप्पासाहेब पाटील

सोलापूर : ब्रेन ट्युमर हा मेंदूच्या कॅन्सरशी संबंधित आजार आहे. यामध्ये लहान मुलांसह मोठ्या व्यक्तींना हा आजार होऊ शकतो. त्याचे वेळीच निदान व उपचार केले तर तो बरा होऊ शकतो आता यावर उपचार करण्यासाठी अत्याधुनिक वैद्यकीय उपचार पध्दती सोलापुरात उपलब्ध आहेत. ब्रेन ट्युमर झालेले रुग्ण उपचारानंतर सर्वसामान्य जीवन जगू शकतात. या आजारापासून स्वत:चा बचाव करण्यासाठी तंबाखू, दारू, सिगारेट आदी व्यसनांपासून दूर राहण्याचा सल्ला सोलापुरातील प्रसिध्द न्युरोलॉजिस्ट डॉ़ प्रसन्न कासेगांवकर यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिला.

जागतिक ब्रेन ट्युमर दिवसाच्या पूर्वसंध्येला न्यूरोलॉजिस्ट डॉ़ प्रसन्न कासेगांवकर यांच्याशी साधलेला संवाद़ ब्रेन ट्युमरविषयी माहिती देताना कासेगांवकर यांनी सांगितले की, सन २००० पासून प्रत्येक वर्षी आठ जून हा जागतिक ब्रेन ट्युमर दिवस म्हणून पाळला जातो. 

ब्रेन ट्युमरविषयी समाजात जाणीव जागृती निर्माण करण्यासाठी या दिवसाचे महत्त्व आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते जगभरात दरदिवशी किमान ५०० रुग्णांना ब्रेन ट्युमर झाल्याचे आढळून येत आहे. या आजाराची नेमकी काय कारणे आहेत, हे अद्याप स्पष्ट नाही. 

ब्रेन ट्युमरचे निदान हे डोक्याचा एक्स-रे, एमआरआय, पेट स्कॅन, मणक्यातील पाण्याचे परीक्षण याद्वारे होऊ शकते. निदान झाल्यावर शल्यचिकित्सा, रेडिओ थेरपी, केमिओथेरपी तसेच औषधांच्या माध्यमातून ब्रेन ट्युमरवर उपचार केला जाऊ शकतो.

डॉक्टरांशी थेट सवाल...प्रश्न : काय आहे ब्रेन ट्युमर आजार? कासेगांवकर : मेंदूमध्ये अनावश्यक पेशींची वाढ झाल्यानंतर मेंदूवर दाब वाढतो़ त्यामुळे मेंदूत एक प्रकारची गाठ निर्माण होते त्याला ब्रेन ट्युमर असे म्हणतात़ ही गाठ मेंदूतील अनेक भागांना धोका निर्माण करते.

प्रश्न : कोणत्या वयातील लोकांमध्ये हा आजार आढळून येतो ?कासेगांवकर : ब्रेन ट्युमर हा आजार १ ते ९० वय वर्षापर्यंत कोणत्याही व्यक्तीला होऊ शकतो़ आजाराला वयाची मर्यादा नाही़ मात्र लहान वयातील मुलांना विना कॅन्सरचा ब्रेन ट्युमर होण्याचे प्रमाण असते तर चाळीशी ते पन्नाशीतील व्यक्तीला कॅन्सरव्दारे होणारा ब्रेन ट्युमर होऊ शकतो़ वयोमानानुसार ब्रेन ट्युमरचे प्रकार वेगवेगळे असू शकतात.

प्रश्न : ब्रेन ट्युमरचे किती प्रकार आहेत व ते कोणते ?कासेगांवकर : साधारण: ब्रेन ट्युमर या आजाराचे दोन प्रकार आहेत़ ब्रेन ट्युमर म्हणजे मेंदूमधील अनियंत्रित पेशींची होणारी वाढ आहे़ ही वाढ पटकन लक्षातही येत नाही. ब्रेन ट्युमरमध्ये दोन प्रकारच्या गाठींचा समावेश असतो. एक म्हणजे कॅन्सरविरहित आणि दुसरी कॅन्सरची. पहिला हा बिनाइन ट्युमर असून, या प्रकारात मेंदूच्या नेहमीच्या पेशींना कुठेही धक्का न लावता ट्युमर वाढतो आणि आॅपरेशन करून हा ट्युमर काढून टाकला तर या विकारापासून मुक्ती मिळू शकते. दुसरा प्रकार हा मेलिग्नंट ट्युमर हा आहे. हा ट्युमर मात्र कॅन्सरचा असतो. त्याचे आॅपरेशन केले, तरी कॅन्सरग्रस्त पेशींची पुन्हा वाढ होऊ शकते तसेच हा प्रकार घातक आहे.

प्रश्न : ब्रेन ट्युमरची लक्षणे काय आहेत ?कासेगांवकर : डोकेदुखी ब्रेन ट्युमरचे महत्त्वाचे लक्षण आहे. या व्यतिरिक्त उलट्या होणे, शरीराचा एक भाग जड होणे, गुंगी येणे, डबल दिसणे, वारंवार शरीराचा तोल जाणे, डोके जड पडणे, स्मरणशक्तीचा लोप पावणे, डोक्यासोबत मान दुखणे, चालताना अडखळणे ही लक्षणे दिसून येतात. तसेच उलट्या, फिट्स येणे, दृष्टिदोष, तिरळेपणा, बोलण्यात अडखळणे,  मानसिक अस्वस्थता, शुद्ध हरपणे तसेच झोपाळू वृत्ती आदी लक्षणेही दिसून येतात.

मुंबई, पुणे नाही सोलापूरच...- एखादा गंभीर आजार झाला की लोक मुंबई, पुण्याचे नाव घेतात़ सोलापूर हे मेडिकल हब म्हणून प्रसिध्द होत आहे़ कर्नाटक, आंध्रप्रदेश, गुजरात, मराठवाडा आदी राज्यातील रूग्ण उपचार घेण्याकरिता सोलापूरला येऊ लागले आहेत़ आता येथे जगातील कोणत्याही आजाराचे निदान लवकर व सुरक्षितपणे होऊ शकतो़ एवढेच नव्हे तर माफक दरात कोणत्याही आजाराचे निदान सोलापुरात होते़ त्यामुळे आता मुंबई, पुणे नाही तर सोलापुरातच निदान करायचे असा अट्टहास रूग्णांच्या नातेवाईकांकडून होत असल्याची माहिती न्यूरोलॉजिस्ट डॉ़ प्रसन्न कासेगांवकर यांनी सांगितले़ 

ब्रेन ट्युमरपासून दूर रहायचे असेल तर प्रत्येक व्यक्तीने व्यसनापासून दूर राहावे, प्रदूषणमुक्त जीवन जगावे, शक्य होईल तेवढे वायु प्रदुषणापासून दूर रहावे़ तंबाखू व दारूमुळे कॅन्सरच्या गाठी तयार होण्याचे प्रमाण अधिक आहे़ त्यामुळे व्यसनापासून दूर रहा, सकस व पोषक घ्या, वेळोवेळी तपासण्या करून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार घ्या़ ब्रेन ट्युमर हा आजार गंभीर आजार नसून सोलापुरात यावर उपचार होऊ शकतो.-डॉ़. प्रसन्न कासेगांवकर,प्रसिध्द न्यूरोलॉजिस्ट, सोलापूर

टॅग्स :SolapurसोलापूरHealthआरोग्यBreast Cancerस्तनाचा कर्करोगcancerकर्करोगdocterडॉक्टरMedicalवैद्यकीय