विद्यार्थिनीच्या आत्महत्येवरून ब्रह्मपुरीत तणाव

By Admin | Updated: October 6, 2015 01:58 IST2015-10-06T01:58:33+5:302015-10-06T01:58:33+5:30

शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात तृतीय वर्गात शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीने रविवारी सायंकाळी गळफास घेऊन आत्महत्या केली. तिने आपल्या डायरीमध्ये गळफास

Brahmapurni Tension from Student's Suicide | विद्यार्थिनीच्या आत्महत्येवरून ब्रह्मपुरीत तणाव

विद्यार्थिनीच्या आत्महत्येवरून ब्रह्मपुरीत तणाव

ब्रह्मपुरी (जि. चंद्रपूर) : शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात तृतीय वर्गात शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीने रविवारी सायंकाळी गळफास घेऊन आत्महत्या केली. तिने आपल्या डायरीमध्ये गळफास घेण्यापूर्वी केलेल्या नोंदीवरून तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली एका प्राध्यापकासह तिघांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
स्वाती सतीश निकुरे (२०) असे या विद्यार्थिनीचे नाव आहे. प्रा. सुहास मेश्राम आणि विद्यार्थी शाहरूख अल्ली सय्यद व रजत जिभकाटे हे नेहमी वर्गात आपल्याला अपमानित करीत होते. एवढेच नव्हेतर, या मुलीबरोबर कुणी राहू नका, तिच्यामुळे पूर्ण वर्ग बिघडला आहे, असे प्रा. मेश्राम सर्वांना सांगत होते, असे तिने मृत्यूपूर्वी लिहिलेल्या डायरीत म्हटले आहे.

Web Title: Brahmapurni Tension from Student's Suicide