प्रेयसीच्या मुलाला धावत्या ट्रेनसमोर फेकले

By Admin | Updated: January 29, 2015 05:50 IST2015-01-29T05:50:54+5:302015-01-29T05:50:54+5:30

आपल्या मित्रांशी प्रेयसीचे होणारे बोलणे आवडत नसल्यामुळे प्रियकरानेच तिच्या चार वर्षांच्या मुलाला रविवारी रात्री जोगेश्वरी रेल्वे स्थानकात बोरीवलीच्या

The boy's boy thrown in front of a moving train | प्रेयसीच्या मुलाला धावत्या ट्रेनसमोर फेकले

प्रेयसीच्या मुलाला धावत्या ट्रेनसमोर फेकले

मुंबई: आपल्या मित्रांशी प्रेयसीचे होणारे बोलणे आवडत नसल्यामुळे प्रियकरानेच तिच्या चार वर्षांच्या मुलाला रविवारी रात्री जोगेश्वरी रेल्वे स्थानकात बोरीवलीच्या दिशेने जाणाऱ्या रेल्वेसमोर फेकून दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली़
या घटनेत त्या चिमुरड्याला आपला उजवा हात गमवावा लागला आहे. त्याच्यावर केईएम रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. संदीप सहदेव बेहरे असे आरोपीचे नाव असून, तो खार येथे राहत असून व्यवसायाने तो इस्टेट एजंट आहे. काही महिन्यांपूर्वी त्याची ओळख एका घटस्फोटीत महिलेशी झाली. मालाड कुरार येथील वैजात पाड्यात ती मुलासोबत राहते. यादरम्यान संदीपशी तिचे प्रेमप्रकरण सुरू झाले. ती आपल्या मित्रांशी गप्पा मारीत असे, हे संदीपला आवडत नसे. मित्रांशी बोलू नको, असा संदीपने तिला दमही दिला होता. यावरून त्यांच्यात नेहमी वाद होत असत. रविवारी संदीप मालाड येथे तिला भेटायला आला, याच कारणावरून दोघांमध्ये पुन्हा वाद झाला. वादानंतर त्याने मुलाला फिरायला नेतो असे सांगून तो घेऊन गेला. काही वेळाने संदीपने तिला रेल्वे अपघातात मुलगा जखमी असल्याचे कळविले.
बोरीवली रेल्वे पोलिसांनी संदीपला चौकशीसाठी ताब्यात घेतले. संदीपनेच मालाड येथून चर्चगेट लोकल पकडून मुलाला जोगेश्वरी स्थानकात आणले. त्यानेच त्या मुलाला लोकलखाली फेकून दिल्याचे उघडकीस आले. अपघातात मुलाचा हात लोकलखाली आल्याने तुटला. हा गुन्हा मालाडमध्ये घडल्याने दिंडोशी पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला. याप्रकरणी पोलिसांनी अपहरण आणि हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी बेहरेला अटक केली. (प्रतिनिधी)

Web Title: The boy's boy thrown in front of a moving train