शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

आई गावाला, वडील कामावर; घरात मुलानं केली आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 17:29 IST

Suicide In Jalgaon : मोबाईलच सांगणार कारण, हरिविठ्ठल नगरातील घटना

ठळक मुद्देमोबाईलच सांगणार कारण, हरिविठ्ठल नगरातील घटनामोबाईलचं लॉक उघडण्यात पोलिसांना अपयश

जळगाव : आई आणि भाऊ गावाला तर वडील रात्रपाळीच्या ड्युटीला असताना रितेश गुलाबराव मोरे (वय १७) या अल्पवयीन मुलाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. शनिवारी सकाळी हरिविठ्ठल नगरात रितेश यानं आपल्या राहत्या घरात गळफास घेतला. रितेश याच्या आत्महत्येचे कारण अजून तरी समजलेले नाही, मात्र लॉ़क असलेल्या मोबाईलमधूनच काही तरी धागेदोरे मिळतील, अशी शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रितेश हा पाण्याचे जार वाटप करण्याचे काम करायचा. शहरातील एका महाविद्यालयतही त्याने प्रवेश घेतला होता. वडील गुलाबराव सुकलाल मोरे एका फायनान्स कंपनीच्या कार्यालयात सुरक्षारक्षक म्हणून काम करतात. शुक्रवारी त्याची आई व भाऊ असे दोघेजण धुळे येथे नातेवाईकांकडे गेले होते. तर वडील  रात्रपाळीसाठी ड्युटीवर गेले होते. शुक्रवारी रात्री रितेश हा एकटाच घरी होता. त्याने साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. शनिवारी सकाळी सात वाजता वडील गुलाबराव मोरे हे ड्युटीवरुन घरी आले, तेंव्हा रितेश आतून काहीच प्रतिसाद देत नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी शेजारी राहणाऱ्यांना बोलावून घेत घराचा दरवाजा तोडला असता रितेश गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आला. ही घटना पाहून वडील गुलाबराव मोरे यांना जबर धक्का बसला. दरम्यान, रामानंदनगर पोलीस ठाण्याचे प्रवीण जगदाळे व मनोज वानखेडे यांनी नागरीकांच्या मदती रितेश याला खाली उतरवून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करुन त्यास मृत घोषित केले. शवविच्छेदन करुन मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला. दुपारी दोन वाजता पिंपळकोळा (ता. एरंडोल) या मूळ गावी रितेशवर अंत्यसंस्कार करण्यात आले. मृत रितेश याच्या पश्चात आई-वडील, एक विवाहित बहिण व लहान भाऊ आकाश असा परिवार आहे. या प्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मोबाईलचं लॉक उघडेनादरम्यान या घटनेनंतर रामानंदनगर पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला तसेच रितेश याने काही सुसाईड नोट लिहिली आहे का यासाठी त्याचे खिसे तसेच इतर ठिकाणी तपासणी केली मात्र तसं काहीच मिळाले नाही. मोबाईल आढळून आला मात्र तो लॉक होता, तो उघडण्याचा प्रयत्न केला असता त्यात अपयश आले. या मोबाईलमधूनच धागेदोरे मिळतील अशी शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. 

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रPoliceपोलिसJalgaonजळगाव