चाकूच्या धाकाने मुलाला लुटले

By Admin | Updated: April 24, 2017 03:38 IST2017-04-24T03:38:43+5:302017-04-24T03:38:43+5:30

रेल्वेचे तिकीट काढण्यासाठी रांगेत उभ्या असलेल्या १३ वर्षांच्या मुलाला चाकूचा धाक दाखवत लुटल्याची घटना शनिवारी रात्री चेंबूर रेल्वे स्थानकात घडली.

The boy robbed the knife | चाकूच्या धाकाने मुलाला लुटले

चाकूच्या धाकाने मुलाला लुटले

मुंबई : रेल्वेचे तिकीट काढण्यासाठी रांगेत उभ्या असलेल्या १३ वर्षांच्या मुलाला चाकूचा धाक दाखवत लुटल्याची घटना शनिवारी रात्री चेंबूर रेल्वे स्थानकात घडली. याबाबत चेंबूर पोलिसांनी अनोळखी व्यक्तीवर गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे.
चेंबूरच्या लोखंडे मार्ग परिसरात राहणाऱ्या अनिल जैन यांचा मुलगा दिनेश हा शनिवारी रात्री ८च्या सुमारास चेंबूर स्थानक परिसरात गेला होता. त्याला मुलुंडला जायचे असल्यामुळे तो स्थानकाच्या पूर्वेकडे असणाऱ्या तिकीट खिडकीच्या रांगेत उभा होता. या वेळी एका अनोळखी व्यक्तीने या मुलाला बाजूला घेत त्याला चाकूचा धाक दाखविला. दिनेशकडे असलेला मोबाइल आणि रोख असा एकूण ५ हजारांचा ऐवज हिसकावून पळ काढला. मुलाने तत्काळ ही बाब वडिलांना कळवली. त्यानुसार, त्यांनी पोलिसांत तक्रार नोंदवली. (प्रतिनिधी)

Web Title: The boy robbed the knife