न्यायालयात जमानत घेणा-या बोगस जमानतदारास अटक

By Admin | Updated: January 21, 2017 02:59 IST2017-01-21T02:59:02+5:302017-01-21T02:59:02+5:30

छायाचित्र दुस-याचे अन् ओळखपत्रही बनावट!

Bouncing the bail bond in the court, arrested | न्यायालयात जमानत घेणा-या बोगस जमानतदारास अटक

न्यायालयात जमानत घेणा-या बोगस जमानतदारास अटक

अकोला, दि. २0- न्यायालयात बोगस दस्तावेजाद्वारे जमानत घेतल्याप्रकरणी पोलिसांनी शुक्रवारी एका आरोपीला अटक केली. महादेव विष्णू वगारे हे आरोपीचे नाव असून, त्याला न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने आरोपीस तीन दिवसांच्या पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.
शेगाव येथील माळीपुरा दसरा मैदान येथील रहिवासी महादेव विठ्ठल वगारे (६४) याने चवथे दिवाणी न्यायाधीश क स्तर यांच्या समक्ष ३0 एप्रिल २0१४ रोजी दुपारी साडेतीन वाजता खोटी साक्ष दिली होती. त्यानुसार जयंत मोरेश्‍वर कुळकर्णी (५५) यांनी न्यायालयातर्फे रामदासपेठ पोलीस स्टेशनला फसवणूक, बोगस कागदपत्रे तयार केल्याची तक्रार दिली होती. यावरून रामदासपेठ पोलिसांनी सदर आरोपी महादेव वगारे यास अटक करून शुक्रवारी न्यायालयात हजर केले. विशेष म्हणजे, न्यायालयीन प्रक्रियेत बोगस दस्तावेज तसेच दुसर्‍याचे छायाचित्र वापरून महादेव वगारे याने किती प्रकरणात खोटी साक्ष दिली. याचा शोध आता घेण्यात येत आहे. वगारे याचे आणखी काही साथीदार आहेत का, या दिशेनेही पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

Web Title: Bouncing the bail bond in the court, arrested