सोळा लाखांच्या जुन्या नोटांसह दोघे ताब्यात
By Admin | Updated: January 21, 2017 06:27 IST2017-01-21T05:57:22+5:302017-01-21T06:27:03+5:30
नाकाबंदीदरम्यान नेहरू नगर पोलिसांनी एका कारमधून १६ लाख रकमेच्या पाचशे आणि हजारांच्या जुन्या नोटांसह दोन जणांना ताब्यात घेतले

सोळा लाखांच्या जुन्या नोटांसह दोघे ताब्यात
मुंबई : नाकाबंदीदरम्यान नेहरू नगर पोलिसांनी एका कारमधून १६ लाख रकमेच्या पाचशे आणि हजारांच्या जुन्या नोटांसह दोन जणांना ताब्यात घेतले आहे. आयकर विभाग याबाबत अधिक चौकशी करीत आहे.
कुर्ला परिसरात नाकाबंदी सुरू असताना पोलिसांना एक कार संशयास्पद रीतीने जाताना दिसली. पोलिसांनी तत्काळ ही कार अडवून कारची तपासणी केली. या कारमध्ये पोलिसांना जुन्या चलनातील पाचशे आणि हजार रुपयांच्या सुमारे १६ लाखांच्या नोटा आढळून
आल्या.
कारचालकाकडे याबाबत चौकशी केली असता पैशांविषयी त्याने समाधानकारक उत्तर दिले नाही. त्यामुळे कारमधील दोघांना ताब्यात घेण्यात आले. (प्रतिनिधी)