‘सेल्फी’च्या नादात दोघांनी गमावला जीव

By Admin | Updated: October 6, 2015 01:43 IST2015-10-06T01:43:48+5:302015-10-06T01:43:48+5:30

नदीत उतरून सेल्फी काढण्याच्या प्रयत्नात दोन शाळकरी विद्यार्थ्यांनी जीव गमावल्याची घटना जिल्ह्यातील पोर्ला येथे रविवारी घडली. एका गुराख्याने प्रसंगावधान दाखवल्याने तिसरा मित्र बचावला.

Both of them lost their lives in the 'selfie' | ‘सेल्फी’च्या नादात दोघांनी गमावला जीव

‘सेल्फी’च्या नादात दोघांनी गमावला जीव

गडचिरोली : नदीत उतरून सेल्फी काढण्याच्या प्रयत्नात दोन शाळकरी विद्यार्थ्यांनी जीव गमावल्याची घटना जिल्ह्यातील पोर्ला येथे रविवारी घडली. एका गुराख्याने प्रसंगावधान दाखवल्याने तिसरा मित्र बचावला.
मुकेश शिवणकर (१७), सूरज कनगंतुलवार (१६) आणि सूरज गेडाम (२०) हे तिघे वैनगंगा नदीवर गेले होते. नदीकाठी जेवण झाल्यावर हे तिघे नदीपात्रात उतरले. पोहोतानाचे सेल्फी काढता-काढता ते खोल पाण्यात गेल्याने वाहून जाऊ लागले. या वेळी जवळच असलेला गुराखी अजय झोडगे याने बैलाच्या साहाय्याने सूरज गेडामला वाचविले, तर मुकेश व सूरज यांचा बुडून मृत्यू झाला. हे दोघेही शिवाजी हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालयात शिकत होते. सूरज हा दहावीत तर मुकेश हा बारावीत होता. (प्रतिनिधी)

Web Title: Both of them lost their lives in the 'selfie'