नवोदयचे दोन्ही शिक्षक न्यायालयीन कोठडीत
By Admin | Updated: April 15, 2015 00:08 IST2015-04-15T00:08:21+5:302015-04-15T00:08:21+5:30
विद्यार्थिनी लैंगिक छळ प्रकरण ; दोन शिक्षिकांची तात्पुरती बदली.
_ns.jpg)
नवोदयचे दोन्ही शिक्षक न्यायालयीन कोठडीत
अकोला : बाभूळगाव जहागिर येथील जवाहर नवोदय विद्यालयातील ४९ विद्यार्थिनींच्या लैंगिक छळप्रकरणी राजन गजभिये आणि शैलेश रामटेके या दोघांना मंगळवारी पॉस्कोच्या विशेष न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने दोघांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. या प्रकरणात आतापर्यंत तीन शिक्षकांना अटक करण्यात आली असून, राजन गजभिये याला मदत करणार्या त्याच्या एका माजी विद्यार्थ्यालाही अटक करण्यात आली होती. या दोन शिक्षकांसोबतच संदीप लाडखेडकर हा शिक्षकही न्यायालयीन कोठडीत असून, त्याने जामिनासाठी अर्ज केला होता. या अर्जावर सोमवारी सुनावणी झाली असून, न्यायालयाने लाडखेडकरचा जामीन अर्ज फेटाळला. दरम्यान, गजिभिये आणि रामटेके यांनी जामिनासाठी अर्ज केला असून, त्यावर गुरुवारी सुनावणी होणार आहे.
*शिक्षिकांची चौकशी होईपर्यंत बदली
नवोदय विद्यालयातील उपप्राचार्य साधना गलाला आणि वसतिगृह अधीक्षक वंदना कांबळे या शिक्षिकांची गुजरातमध्ये बदली करण्यात आल्याची माहिती नवोदय विद्यालयाचे साहाय्यक आयुक्त पीव्हीएनआर राजू यांनी 'लोकमत'शी बोलताना दिली. याबाबत अद्याप कुठलीही प्रशासकीय किंवा इतर कारवाई करण्यात आलेली नसून, केवळ तात्पुरत्या स्वरूपात बदली करण्यात आली आहे.