सोलापूरमध्ये अपघातात दोघांचा मृत्यू
By Admin | Updated: May 9, 2016 12:23 IST2016-05-09T08:03:22+5:302016-05-09T12:23:15+5:30
सोलापूरहून हैदराबादकडे जाणा-या आयशर आणि ट्रकच्या धडकेत दोघांचा मृत्यू झाला आहे. दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक झाली

सोलापूरमध्ये अपघातात दोघांचा मृत्यू
>ऑनलाइन लोकमत -
सोलापूर, दि. 09 - सोलापूरहून हैदराबादकडे जाणा-या आयशर आणि ट्रकच्या धडकेत दोघांचा मृत्यू झाला आहे. दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक झाली. दोघांचा मृत्यू झाला असून दोघे जखमी झाले आहेत. मृतांमध्ये 25 वर्षीय अहमद जलाल शेख याचा समावेश असून दुस-या व्यक्तीची ओळख पटवण्याचे काम सुरु आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. अपघातात जखमी झालेल्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून उपचार सुरु आहेत.