अत्याचार करणाऱ्या दोघांना अटक

By Admin | Updated: July 21, 2014 03:24 IST2014-07-21T03:24:02+5:302014-07-21T03:24:02+5:30

डोंबिवली येथील मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत जून महिन्यात १७ वर्षीय विद्यार्थिनीला गुंगीचे औषध देऊन अज्ञात तरुणांनी अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली होती.

Both arrested and abused | अत्याचार करणाऱ्या दोघांना अटक

अत्याचार करणाऱ्या दोघांना अटक

कल्याण : डोंबिवली येथील मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत जून महिन्यात १७ वर्षीय विद्यार्थिनीला गुंगीचे औषध देऊन अज्ञात तरुणांनी अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली होती. या घटनेचे शहरात तीव्र पडसाद उमटले होते. तसेच त्या नराधमांना अटक करून कठोर शिक्षा करण्याची मागणी विविध सामाजिक संस्थांसह पालकांनी केली होती. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करून एक महिन्याच्या कालावधीत रोहन भोईर आणि अबू अन्सारी या दोघांना अटक केली. दोघेही आजदेगाव परिसरातील रहिवासी असल्याचे अतिरिक्त पोलीस आयुक्त शरद शेलार यांनी लोकमतला सांगितले.
युवती सुदामानगर परिसरातील तिच्या घराजवळ बेशुद्धावस्थेत आढळली होती. तिच्या पालकांनी तिला जवळच असणाऱ्या एका खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. तिच्यावर अत्याचार झाल्याचे वैद्यकीय तपासणीत निष्पन्न झाले. तसेच गुंगीचे औषध देऊन या तरुणीवर अत्याचार करण्यात आला होता. शहरात या घटनेचे तीव्र पडसाद उमटले होते. मात्र, बेशुद्धावस्थेत अत्याचार झाल्याने मुलगी आरोपींना ओळखत नव्हती. त्यामुळे पोलिसांसमोर या आरोपींना पकडणे मोठे आव्हान होते. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज, शेकडो तरुणांची चौकशी आणि विविध तपासाच्या क्लृप्त्या योजून अखेर याप्रकरणी गुरुवारी रात्री रोहन भोईर आणि अबू अन्सारी या दोन आरोपींना मोठ्या शिताफीने अटक केली. कॉलेज परिसरात भटकणे आणि मुलींची छेडछाड करणे, असे प्रकार ते करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. शुक्रवारी त्यांना कल्याण सत्र न्यायालयात हजर केले असता त्यांना पाच दिवसांची कोठडी सुनावली. याबाबत पोलीस पुढील तपास करीत असून आरोपींनी यापूर्वीदेखील असे काही गुन्हे केले आहेत का, याचा तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Both arrested and abused

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.