नाशिकमधील बोटॅनिकल गार्डनमध्ये गुंडांची तोडफोड
By Admin | Updated: January 6, 2017 21:20 IST2017-01-06T21:20:43+5:302017-01-06T21:20:43+5:30
नाशिकमधील बोटॅनिकल गार्डनमध्ये काही गुंडांनी धुडघूस घातल्याची घटना शुक्रवारी संध्याकाळी घडली.

नाशिकमधील बोटॅनिकल गार्डनमध्ये गुंडांची तोडफोड
>ऑनलाइन लोकमत
नाशिक, दि. 05 - नाशिकमधील बोटॅनिकल गार्डनमध्ये काही गुंडांनी धुडघूस घातल्याची घटना शुक्रवारी संध्याकाळी घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकमध्ये गेल्या काही दिवसांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उद्धाटन केलेल्या बोटॅनिकल गार्डनमध्ये काही गुंडांनी लेझर शोच्या कार्यक्रमादरम्यान तोडफोड केली.
तिकीट खिडकीवर गुंडांनी प्रवेश शुल्कावरुन वाद घातला आणि विना तिकिट प्रवेश केला. तसेच, तिकीट खिडक्यांची तोडफोड केल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून चौकशी सुरु आहे.