कॉर्पोरेट कार्यालयात बॉसकडून तरुणीची फसवणूक

By Admin | Updated: July 7, 2016 08:57 IST2016-07-07T08:34:17+5:302016-07-07T08:57:21+5:30

कॉर्पोरेट जगतात महिलांचा छळ होत असल्याचे आपण सिनेमांमध्ये पाहिले असेल. काही वेळा अशा घटना कानावरही येतात.

Boss falsely assaulted by Boss in corporate office | कॉर्पोरेट कार्यालयात बॉसकडून तरुणीची फसवणूक

कॉर्पोरेट कार्यालयात बॉसकडून तरुणीची फसवणूक

- पूजा दामले मुंबई

कॉर्पोरेट जगतात महिलांचा छळ होत असल्याचे आपण सिनेमांमध्ये पाहिले असेल. काही वेळा अशा घटना कानावरही येतात.
पण अशा छळाचा केवढा मानसिक त्रास होऊन तो गंभीर स्वरूप धारण करू शकतो, हे एका घटनेतून समोर आले आहे.
सतत ताणाखाली असल्यामुळे अचानक शांत झालेल्या सोनलला (नाव बदलले आहे) घरच्यांनी काय झाले? असे विचारले. पण, समाधानकारक उत्तर सोनलकडून न मिळाल्याने तिला जेजे रुग्णालयात मानसोपचारतज्ज्ञांकडे नेण्यात आले. तेव्हा आॅफिसमधील बॉसने प्रेमाचे खोटे नाटक करुन शरीरसंबंध ठेवून फसवल्याचे वास्तव समोर आले.
मुंबईत राहणाऱ्या २५ वर्षीय सोनलला पदवी संपादन केल्यावर एका कॉर्पोरेट कंपनीत नोकरी मिळाली. कॉर्पोेरेट क्षेत्रातील मोकळ्या वातावरणाला सोनल काही प्रमाणात भुलली होती. त्यामुळे ५० वर्षीय बॉसचे आपल्यावर खरोखरच प्रेम असल्याचा काही दिवसांत तिचा समज झाला. दोघांचे प्रेमसंबंध अधिक दृढ होत गेले. कालांतराने बॉसकडून नात्यातल्या अपेक्षा वाढत गेल्या. दोघांमध्ये शारीरिक संबंध प्रस्थापित झाले. या वेळी बॉसने शारीरिक संबंधांवेळीचे फसवून फोटो काढले. त्यानंतर त्याचा खरा चेहरा तिच्या समोर आला. फोटो व्हायरल करण्याची भीती दाखवून शारीरिक संबंध ठेवण्यासाठी तो तिच्याकडे जबरदस्ती करू लागला. त्याच्याकडे फोटो असल्यामुळे आणि नोकरी टिकवण्यासाठी सोनल या जबरदस्तीला बळी पडली.
प्रेमसंबंधांचे नाटक असल्याचे लक्षात आल्यावर सोनलवरचा ताण वाढत गेला. परिणामी तिच्या वर्तनात बदल होत गेले. घरच्या लोकांशी तिचा संवाद कमी झाला. सोनलच्या वर्तनातील बदल पाहून कुटुंबीयांनी तिला जेजे रुग्णालयातील मानसोपचार विभागात नेले. पहिल्यांदा सोनल तणावाखाली असल्याची लक्षणे होती. तिच्या तणावाचे कारण शोधण्यात दोन सत्रे गेली. पण, तोपर्यंत ती काहीही बोलत नव्हती. तिसऱ्या सत्रावेळी सोनलने हा सगळा प्रकार कथन केला. हळूहळू घडलेला सगळा प्रकार तिने सांगितल्याचे मानसोपचारतज्ज्ञ डॉ. सागर मुंदडा यांनी ‘लोकमत’ला सांगितले. प्रेमसंबंधाचे नाटक करून फसविल्याच्या या प्रकारामुळे कॉर्पोरेट जगतातील हे विदारक वास्तव समोर आले. पण, अनेकदा मुली घाबरून, नोकरी सांभाळायची म्हणून अशा आमिषांना बळी पडतात. हे योग्य नाही. भीतीपोटी या प्रकरणांची नोंद पोलिसांकडे केली जात नाही. मुली महिलांनी जागरूक राहणे आवश्यक असल्याचेही डॉ. मुंदडा यांनी स्पष्ट केले.

मुलींनी काय करावे?
नोकरीसाठी वा अन्य कारणांसाठी आमिषांना बळी पडू नये
घाबरून जाऊ नये
घरच्यांना विश्वासात घेऊन सर्व गोष्टी सांगाव्यात
पोलिसांत तक्रार दाखल करावी
फोटो, व्हिडीओ आहेत, म्हणून गप्प राहणे टाळावे

कसा होतो छळ...
कोणत्याही कामाच्या बदल्यात शारीरिक संबंधांची मागणी करणे
स्वत:च्या अधिकारांचा वापर करून शारीरिक छळ करणे
फोटो व्हायरल करण्याची भीती दाखवून शारीरिक संबंध ठेवणे
परवाना अथवा अन्य परवानग्यांचे आमिष दाखवून शारीरिक संबंधांची मागणी
करणे
 

Web Title: Boss falsely assaulted by Boss in corporate office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.