बोरिवली हत्याकांडाचे गूढ उकलले?
By Admin | Updated: September 7, 2014 23:35 IST2014-09-07T22:38:10+5:302014-09-07T23:35:33+5:30
बोरिवली बाभईनाका येथील कृष्णा क्लासिक इमारतीत राहणार्या सीमा पाताडे यांच्या हत्येप्रकरणी बोरिवली पोलिसांनी महिलेच्या मुलीच्या प्रियकराला ताब्यात घेतले आहे.

बोरिवली हत्याकांडाचे गूढ उकलले?
मुंबई: बोरिवली बाभईनाका येथील कृष्णा क्लासिक इमारतीत राहणार्या सीमा पाताडे यांच्या हत्येप्रकरणी बोरिवली पोलिसांनी महिलेच्या मुलीच्या प्रियकराला ताब्यात घेतले आहे. त्याची आता कसून चौकशी सुरु आहे. पोलिसांनी या हत्येच्या तपासाकरिता पाच ते सहा जणांना संशयित म्हणून चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. आता या हत्येचा मुख्य संशियत म्हणून प्रियकराला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या हत्येचा महिलेच्या मुलीचाही सहभाग होता का, या दिशेनेही पोलीस चौकशी करीत आहेत. मात्र, बोरिवली पोलिसांनी अधिकृतपणे बोलण्यास नकार दिला.
शुक्र वारी दुपारी सीमा यांची राहत्या घरात त्या एकटे असताना हत्या करण्यात आली होती. तसेच त्यांच्या घरातून अंदाजे दीड लाख किंमतीचे साडेपाच तोळे सोने देखील चोरी झाल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणाचा तपास बोरिवली पोलीस व गुन्हे शाखा ११ हे संयुक्तरित्या करत आहे. मात्र, अद्याप हत्येचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाही. संशयितांना ताब्यात घेण्यात आलेले असले तरी देखील चौकशी सुरु असून त्यापैकी काहींना अटक होण्याची शक्यता आहे. सखोल तपास सुरु असल्याची माहिती परिमंडळ अकराचे पोलीस उपायुक्त बालसिंग राजपूत यांनी दिली. (प्रतिनिधी)