त्रासाला कंटाळलेल्या पत्नीने पतीच्या डोक्यात घातला दगड
By Admin | Updated: June 16, 2016 02:40 IST2016-06-16T02:40:33+5:302016-06-16T02:40:33+5:30
पतीकडून दररोज होणारी मारहाण व छळ याचा त्रास अनावर झाल्याने विवाहितेने पतीच्या डोक्यात दगड घालून त्याचा खून केल्याची घटना मंगळवारी मध्यरात्री अंतुर्ली (ता. मुक्ताईनगर) येथे घडली.

त्रासाला कंटाळलेल्या पत्नीने पतीच्या डोक्यात घातला दगड
जळगाव : पतीकडून दररोज होणारी मारहाण व छळ याचा त्रास अनावर झाल्याने विवाहितेने पतीच्या डोक्यात दगड घालून त्याचा खून केल्याची घटना मंगळवारी मध्यरात्री अंतुर्ली (ता. मुक्ताईनगर) येथे घडली.
महिलेस अटक करण्यात आली आहे. पिंप्रीकेऱ्हाळा (ता.रावेर) येथील हरलाल बिसन बारेला व त्याची पत्नी सुरेखा हे रोजगाराच्या निमित्ताने काही वर्षांपासून अंतुर्लीत पांडुरंग दुट्टे यांच्या शेतात वास्तव्यास आहेत. (प्रतिनिधी)