मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर बूटफेक

By Admin | Updated: January 7, 2017 05:22 IST2017-01-07T05:22:29+5:302017-01-07T05:22:29+5:30

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ताफ्यावर काँग्रेसचा माजी तालुका सरचिटणीस असलेल्या नरेंद्र गणपत रहांगडाले या काँग्रेस कार्यकर्त्याने बूट भिरकावला.

Boot up on the Chief Minister's convoy | मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर बूटफेक

मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर बूटफेक


तिरोडा (गोंदिया) : नगर परिषद निवडणुकीच्या प्रचारसभेसाठी तिरोड्यात आलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ताफ्यावर काँग्रेसचा माजी तालुका सरचिटणीस असलेल्या नरेंद्र गणपत रहांगडाले या काँग्रेस कार्यकर्त्याने बूट भिरकावला. पोलिसांनी त्याला लगेच ताब्यात घेतले. ही घटना शुक्रवारी सायंकाळी ६.२०च्या सुमारास घडली. प्राप्त माहितीनुसार, तिरोडा येथे नगर परिषदेतील भाजपा उमेदवारांच्या प्रचारसभेसाठी मुख्यमंत्री सायंकाळी तिरोड्यात आले होते. मैदानावरून त्यांच्या वाहनांचा ताफा गोंदियाच्या दिशेने निघाला तेव्हा सभास्थळाजवळ हा प्रकार घडला. (प्रतिनिधी)

Web Title: Boot up on the Chief Minister's convoy