शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

Neelam Gorhe : पुस्तकांच्या दुकानांचा समावेश अत्यावश्यक सेवेत करा, नीलम गोऱ्हेंची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2021 19:51 IST

Neelam Gorhe : पुस्तकांच्या दुकानांचा अत्यावश्यक सेवेत समावेश करण्याची विनंती विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र देऊन केली आहे.

ठळक मुद्दे'उद्योग क्षेत्राला जसा त्याचा फटका बसला असला तरीसुद्धा राज्य सरकारने उद्योग चालू ठेवण्यासाठी पराकाष्ठा केली आहे.'

पुणे : कोरोना संकट काळात एकटे राहणे, कुटुंबीयांवर कोरोनाचा आघात होणे, कोरोनामुक्त झाल्यावर घरातच थांबावे लागणे अशा परिस्थितीत लोकांचे मनोबल वाढविणे अतिशय गरजेचे आहे. हे मनोबल वाढविण्यासाठी साहित्य मोठी भूमिका बजावत असते आणि साहित्यातून माणसाला उमेदही मिळत असते. त्यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर इतर दुकानांचा अत्यावश्यक सेवेत समावेश केला आहे. त्याचप्रमाणे पुस्तकांच्या दुकानांचा अत्यावश्यक सेवेत समावेश करण्याची विनंती विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मराठी भाषा मंत्री सुभाषजी देसाई, नगरविकास मंत्री एकनाथजी शिंदे, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांना पत्र देऊन केली आहे. (Bookstores should be included in essential services, Neelam Gorhe demanded)

गेले पंधरा महिने कोरोनामुळे समाजाची गती फार मोठ्या प्रमाणात मंदावलेली आहे. उद्योग क्षेत्राला जसा त्याचा फटका बसला असला तरीसुद्धा राज्य सरकारने उद्योग चालू ठेवण्यासाठी पराकाष्ठा केली आहे. कोरोना ग्रस्तांची संख्या आता कमी होण्याची चिन्हे अनेक जिल्ह्यांमध्ये दिसत आहेत आणि त्यामुळे चोवीस शहरात दुकानांच्या वेळा वाढविण्यात आल्या आहेत. त्यानुसार दुपारी दोनपर्यंत दुकानांना परवानगी दिलेली आहे. त्याचप्रमाणे पुस्तकांची जी दुकाने आहेत आणि विशेषतः वेगवेगळ्या प्रकारची मराठी साहित्यांची दुकाने आहेत, ती आणि अन्य भाषिक पुस्तकांची दुकाने सुरू करण्यासाठी परवानगी द्यावी, अशी विनंती नीलम गोऱ्हे यांनी केली आहे. 

याचबरोबर, ही परवानगी ताबडतोब अंमलात आणावी. तसेच, पुस्तकांच्या इतर दुकानांची वेळ आहे. त्यांच्याकडून जशा बाकीच्या वस्तू घरपोच दिल्या जाऊ शकतात. त्याचप्रमाणे ही पुस्तक सुद्धा घरपोच देण्याची व्यवस्था जे दुकानदार करतील त्यांना तशी परवानगी द्यावी. त्यासाठी त्वरित पुस्तकांच्या दुकानांबाबतचे निर्बंध आपण बदलून त्यांना अत्यावश्यक सेवेमध्ये समाविष्ट करावे, अशी मागणी नीलम गोऱ्हे यांनी सदर पत्रात केली आहे. तसेच, याचा उपयोग निश्चितपणाने प्रकाशन क्षेत्र, साहित्य क्षेत्रांवर अत्यंत चांगल्या प्रकारचा झालेला दिसेल. या दृष्टीकोनातून विशेष लक्ष द्यावे, अशी विनंती देखील नीलम गोऱ्हे यांनी केली आहे.

टॅग्स :Neelam gorheनीलम गो-हेcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस