शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

भूगोलाच्या पुस्तकात गुजराती भाषेत धडा, खोटे ठरल्यास सभागृहात आत्महत्या करेन; सुनील तटकरेंचा विधान परिषदेत इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2018 06:34 IST

सहावीच्या भूगोल विषयाच्या पुस्तकात गुजराती भाषेत धडा छापल्यावरून विधान परिषदेत शुक्रवारी गदारोळ झाला. विरोधकांनी ‘ती’ पाने नंतर जोडल्याचा आरोप सभागृह नेते चंद्रकांत पाटील यांनी करताच, मी खोटा असेन, तर सभागृहात विष घेऊन आत्महत्या करेन

नागपूर - सहावीच्या भूगोल विषयाच्या पुस्तकात गुजराती भाषेत धडा छापल्यावरून विधान परिषदेत शुक्रवारी गदारोळ झाला. विरोधकांनी ‘ती’ पाने नंतर जोडल्याचा आरोप सभागृह नेते चंद्रकांत पाटील यांनी करताच, मी खोटा असेन, तर सभागृहात विष घेऊन आत्महत्या करेन, असे संतप्त उद्गार राष्टÑवादीचे नेते सुनील तटकरे यांनी काढले.तटकरे यांनी भूगोलाच्या पुस्तकात काही पाने गुजरातीत असल्याचा दावा केला. ते पुस्तकही दाखविले. मराठीला अभिजात दर्जा देण्याची भाषा करणाऱ्या भाजपा सरकारच्या काळात मराठी पाठ्यपुस्तकात गुजराती मजकूर कसा? महाराष्ट्राने अभिमान गुजरातकडे गहाण ठेवला का, असा सवाल भाई जगताप यांनी केला. धनंजय मुंडे यांनी राज्यातील पुस्तके गुजरातमधील कंत्राटदार कसा काय छापतो, असा प्रश्न केला.सभागृह दोनदा तहकूबसभागृह नेते चंद्रकांत पाटील यांनी सरकारची बाजू मांडताना विरोधकांवरच प्रत्यारोप केला. जर पुस्तकांमध्ये खरोखरच अशी चूक असती, तर आतापर्यंत आरडाओरड झाली असती. तटकरे यांनी सादर केलेल्या संबंधित पुस्तकाच्या प्रतीमध्ये पाने जोडली गेली आहेत, असा आरोप पाटील यांनी करताच सभागृहात एकच गोंधळ झाला. या गोंधळात सभागृह दोनदा तहकूब करण्यात आले. त्यानंतर, परत कामकाज सुरू झाल्यानंतर तटकरे यांनी आक्रमक पवित्रा घेतला.आम्ही भूगोलाच्या पुस्तकात गुजराती छापून आणले, हा चंद्रकांत पाटील यांचा आरोप दुर्दैवी आहे. मी तसे केल्याचे वा माझा आरोप खोटा असल्याचे सिद्ध केल्यास मी सभागृहातच विष घेऊन आत्महत्या करेन, असा इशारा तटकरे यांनी दिला. यानंतर, गोंधळ वाढल्याने सभापतींनी कामकाज दिवसभरासाठी तहकूब केले.खुलासा करण्याचे आदेशया विषयावर सोमवारपर्यंत खुलासा करण्याचे निर्देश सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी सरकारला दिले. ही बाब केवळ मराठी अस्मितेशी संबंधित नाही, तर विद्यार्थ्यांपर्यंत ही पुस्तके गेली असून, त्यांना गुजराती समजण्याचा प्रश्नच येत नाही. त्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी सरकारने तातडीने पावले उचलावी, असे ते म्हणाले.शिवसेनेची सावध भूमिकामराठीबाबत कायम आग्रही असणाºया शिवसेनेच्या सदस्यांनी या प्रकरणातसावध भूमिका घेतली. या मुद्द्यावर सर्व सदस्यांनी मौन बाळगले. त्यानंतर, डॉ.नीलम गोºहे यांनी हा प्रकार गंभीर असल्याचे वक्तव्य केले. न्यायालयीन स्टाफच्या परीक्षेत उमेदवारांना गुजराती येते का, असे विचारण्यात आल्याच्या मुद्द्याकडेदेखील त्यांनी सभागृहाचे लक्ष वेधले. 

टॅग्स :educationशैक्षणिकMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार