पुस्तकाचं भिलार गाव ठरावं प्रकाशनाचं डेस्टिनेशन!
By Admin | Updated: May 4, 2017 18:29 IST2017-05-04T18:29:53+5:302017-05-04T18:29:53+5:30
‘वाचन संस्कृतीला बळ देण्यासाठी आणि लोकांच्या ज्ञान पिपासू वृत्तीला खतपाणी घालण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने देशातलं पहिलं पुस्तकांचं गाव आपण महाबळेश्वर

पुस्तकाचं भिलार गाव ठरावं प्रकाशनाचं डेस्टिनेशन!
>आॅनलाइन लोकमत
सातारा, दि.04 - ‘वाचन संस्कृतीला बळ देण्यासाठी आणि लोकांच्या ज्ञान पिपासू वृत्तीला खतपाणी घालण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने देशातलं पहिलं पुस्तकांचं गाव आपण महाबळेश्वर तालुक्यातील भिलार इथं उभारलंय. या गावाला साहित्यप्रेमी मोठ्या संख्येने भेटी देऊन आपली ज्ञानलालसा पूर्ण करतील, आता पुस्तक प्रकाशकांची मोठी जबाबदारी आहे. लोक जयपूर हे ठिकाण लग्नाचे डेस्टिनेशन म्हणून निवडतात. त्याच पद्धतीने भिलार हे गाव ‘पुस्तक प्रकाशनाचे’ डेस्टिनेशन होईल,’ असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भिलार येथे व्यक्त केला.
भिलार गावामध्ये ‘पुस्तकांचं गाव’ या उद्घाटन सोहळ्यात मुख्यमंत्री बोलत होते. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ‘ज्ञान मिळविण्याची इच्छा जोपर्यंत संपत नाही. तोपर्यंत पुस्तकाचं अस्तित्व संपणार नाही. अलीकडे माध्यमं मोठ्या संख्येने वाढली असली तरी वेगवेगळ्या प्रकारे ज्ञान मिळविण्यासाठी लोक आसूसलेले आहेत. पुस्तकांमुळे विकासाच्या कक्षा रुंदावतात. वारकरी सांप्रदायामुळे महाराष्ट्रातील जनतेला ईश्वर व निसर्गाची नातं जोडता आलं. संतांनी जी परंपरा निर्माण केली. तिच पुढे साहित्यिकांनीही जोपासली आहे. भिलार या पुस्तकाच्या गावी साहित्यप्रेमींना कथा, कादंब-या, बालसाहित्य असे विविध प्रकारचं साहित्य वाचायला मिळणार आहे. याचा निखळ आनंद वाचकप्रेमींनी घ्यावा,’ असे आवाहनही यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.