स्वखर्चाने बांधला कच्चा बंधारा
By Admin | Updated: January 23, 2017 15:55 IST2017-01-23T15:55:38+5:302017-01-23T15:55:38+5:30
गेल्या दोन- तीन वर्षांमधील पाणी टंचाई पाहता सामाजिक जाणिवेतून येथील यशवंत भिला पाटील या

स्वखर्चाने बांधला कच्चा बंधारा
ऑनलाइन लोकमत
गुढे (जळगाव), दि, 23 - गेल्या दोन- तीन वर्षांमधील पाणी टंचाई पाहता सामाजिक जाणिवेतून येथील यशवंत भिला पाटील या शेतकऱ्याने स्वत: एक लाख रुपये खर्चून गुढे- कोळगाव रस्त्याच्या बाजूलास असलेल्या नाल्यावर कच्चा बंधारा बांधला आहे. यामुळे पावसाळ्यातील पाणी अडवले जावून परिसरातील जलपातळी सुधारण्यास मदत झाली आहे. यामुळे परिसरात या कामाचे कौतुक होत आहे.
या नाल्याच्या आजूबाजूचे १५० ते १७५ एकर परिसरातील शेतकरी पाण्याअभावी अनेक वर्षापासून तळमळत होते. भर उन्हाळ्यात गुरांना देखील पिण्यासाठी पाणी मिळेनासे झाले होते. ही बाब लक्षात घेता यशवंत पाटील यांनी हा कच्चा बंधारा बांधला आहे. यामळे शेतीसाठी व गुरांसाठी उन्हाळ्यातही पाणी उपलब्ध राहणार आहे. या ठिकाणी २५-३० घरांची वस्ती असून त्यांनाही या बंधाऱ्याचा लाभ झाला आहे. उन्हाळ्याची नेहमीची पाणी समस्या या बंधाऱ्यामुळे सुटण्यास मदत होणार असल्यामुळे परिसरातील शेतकरी व वस्तीतील कुुटंबामध्ये समाधान पसरले आहे. (वार्ताहर)