शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे टोल वसूलीचा तपास होणार?; टोल वसूली पूर्ण न झाल्याबद्दल न्यायालयानं व्यक्त केलं आश्चर्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2021 14:00 IST

२२,३७० कोटी रूपयांची वसूली बाकी असल्याचं एमएसआरडीसीचं म्हणणं

ठळक मुद्दे२२,३७० कोटी रूपयांची वसूली बाकी असल्याचं एमएसआरडीसीचं म्हणणंखर्चाच प्रतिज्ञापत्रात उल्लेख नसल्याचं न्यायालयानं आणलं निदर्शनास

मुंबई उच्च न्यायालयानं मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील टोल वसू्लीच्या सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गाचा खर्च अद्यापही वसूल झाला नाही याबाबत आश्चर्य व्यक्त केलं. यापूर्वी उच्च न्यायायलात महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून एक प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात आलं होतं. परंतु न्यायालयानं यावर नाराजी व्यक्त केली. यामध्ये मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गाच्या निर्मितीसाठी किती खर्च आला आणि प्रत्येक वर्षी त्याच्या देखभालीसाठी किती खर्च केला जातो याचा उल्लेखही करण्यात आला नव्हता. मुंबई उच्च न्यायालयात सामाजिक कार्यकर्ते प्रविण वाटेगांवकर यांनी मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील टोल वसूली बंद करण्यासाठी एक जनहित याचिका दाखल केली होती. त्यावर बुधवारी न्यायालयात सुनावणी पार पडली. कंत्राटदारानं मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील टोल वसूलीमधून निर्धारित रकमेपेक्षा अधिक टोल वसूली केली आहे. यासाठीच टोल वसूली बंद करण्यात यावी अशी मागणी या याचिकेद्वारे करण्यात आली. बुधवारी मुख्य न्यायाधीश दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती गिरीष कुलकर्णी यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली. 

२२,३७० कोटी रूपयांची वसूली बाकी : एमएसआरडीसीयारम्यान, अद्याप मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील खर्चाची रक्कम पूर्णपणे वसूल झाली नसल्याचं एमएसआरडीसीच्या वकिलांनी न्यायालयाला सांगितलं. एमएसआरडीसीला अद्यापही २२ हजार ३७० कोटी रूपयांची रक्कम वसूल करणं शिल्ल आहे. यामुळे २०३० पर्यंत मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर टोल वसूली कायम राहणार असल्याचं त्यांनी न्यायालयाला सांगितलं. दरम्यान, एमएसआरडीसीनं दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गासाठी किती खर्च आला याचा उल्लेखदेखील केला नसल्याचं न्यायालयानं निदर्शनास आणून दिलं. तसंच आतापर्यंत ही रक्कम वसूल झाली नाही यावर विश्वास करणं कठिण असल्याचंही न्यायालयानं म्हटलं. यावेळी न्यायालयानं या प्रकल्पाबाबत कॅगच्या अहवालात देण्यात आलेल्या माहितीवरही लक्ष वेधलं. या प्रकरणाचा तपास कॅगद्वारे करण्याचं प्रस्तावित करण्यात आलं. तसंच महाधिवक्ता आणि अॅडिशनल सॉलिसिटर जनलर यांचं म्हणणंही ऐकून घेतलं जाणार असून त्यानंतर पुढील निर्देश देण्यात येणार असल्याचं न्यायालयानं म्हटलं होतं.  

 

टॅग्स :MumbaiमुंबईPuneपुणेtollplazaटोलनाकाHigh Courtउच्च न्यायालयhighwayमहामार्ग