हायकोर्टात बॉम्बची अफवा

By Admin | Updated: August 11, 2015 02:13 IST2015-08-11T02:13:56+5:302015-08-11T02:13:56+5:30

सोमवारी उच्च न्यायालयात बॉम्ब ठेवल्याचा निनावी फोन आला व एकच खळबळ उडाली. काही वेळातच बॉम्बशोधक व नाशक पथक न्यायालयात दाखल झाले आणि त्यांनी संपूर्ण न्यायालय

Bombardment | हायकोर्टात बॉम्बची अफवा

हायकोर्टात बॉम्बची अफवा

मुंबई : सोमवारी उच्च न्यायालयात बॉम्ब ठेवल्याचा निनावी फोन आला व एकच खळबळ उडाली. काही वेळातच बॉम्बशोधक व नाशक पथक न्यायालयात दाखल झाले आणि त्यांनी संपूर्ण न्यायालय पिंजून काढले. मात्र पथकाच्या हाती काहीही न लागल्याने हा निनावी फोन अफवा असल्याचे स्पष्ट झाले.
मुख्य न्यायाधीश मोहित शहा हे सोमवारी नागपूर खंडपीठात सुनावणी घेण्यासाठी गेले होते. न्यायालयाचे कामकाज प्रभावित न होता शोध घेण्याचे निर्देश वरिष्ठ न्यायाधीश म्हणून विजया कापसे-ताहिलरमानी पोलिसांना दिले. न्या. व्ही.एम. कानडे व न्या. बी.पी. कुलाबावाला यांनी काही वेळासाठी कामकाज थांबवले. तिथे गोमांस हत्या बंदीविरोधातील याचिकेची सुनावणी सुरू होती. (प्रतिनिधी)

Web Title: Bombardment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.