दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी बॉलीवूडचा 'खिलाडी' सरसावला
By Admin | Updated: April 19, 2016 16:31 IST2016-04-19T16:30:21+5:302016-04-19T16:31:22+5:30
बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी सरसावला आहे. अक्षय कुमारने दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी राज्य सरकारच्या जलयुक्त शिवार अभियानांतर्गत ५० लाख रुपयांचा निधी दिला आहे.

दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी बॉलीवूडचा 'खिलाडी' सरसावला
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १९ - बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी सरसावला आहे. अक्षय कुमारने दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी राज्य सरकारच्या जलयुक्त शिवार अभियानांतर्गत ५० लाख रुपयांचा निधी दिला आहे.
महाराष्ट्रातील काही भागात मोठ्याप्रमाणात दुष्काळ पडला आहे. राज्यातील ४३,००० गावांपैकी जवळजवळ २७, ७२३ गांवाना दुष्काळाची झळ बसल्याचे घोषित करण्यात आले आहे. या दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी अनेक संस्थांनी पुढाकार घेतला. तसेच, आता बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार याने दुष्काळ असलेल्या गावांमध्ये वॉटर हार्वेस्टिंग आणि तलाव बांधण्यासाठी राज्य सरकारच्या जलयुक्त शिवार अभियानांतर्गत ५० लाख रुपयांचा निधी सरकारकडे सोपविला आहे. दरम्यान, याप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अक्षय कुमारचे आभार मानले आहेत.
या आधीही अक्षय कुमार पावसाने दडी मारल्याने आत्महत्या करणा-या शेतक-यांच्या कुटुंबियांच्या मदतीसाठी ९० लाख रुपयांची मदत केली होती.