इफेड्रीन प्रकरणात बॉलीवूडचा हास्यअभिनेता

By Admin | Updated: July 2, 2016 04:30 IST2016-07-02T04:30:03+5:302016-07-02T04:30:03+5:30

इफेड्रीन ड्रग्ज प्रकरणात एक हास्यवीर अभिनेता असल्याचे काही पुरावे ठाणे पोलिसांच्या हाती लागले

Bollywood comedians in ephedrine case | इफेड्रीन प्रकरणात बॉलीवूडचा हास्यअभिनेता

इफेड्रीन प्रकरणात बॉलीवूडचा हास्यअभिनेता


ठाणे : इफेड्रीन ड्रग्जप्रकरणी मुंबईतील एका आलिशान हॉटेलमध्ये झालेल्या बैठकीत आरोपी किशोर राठोड, जय मुखी यांच्यासोबत बॉलीवूडमधील एक हास्यवीर अभिनेता उपस्थित असल्याचे काही पुरावे ठाणे पोलिसांच्या हाती लागले आहे. मात्र, ठोस पुरावे नसल्याने त्याचे नाव गुलदस्त्यात ठेवून संबंधित हॉटेलमधील त्या वेळचे सीसीटीव्ही फुटेज मिळावे, अशी मागणी ठाणे पोलिसांनी त्या हॉटेलवाल्याकडे केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
याचदरम्यान, विकी गोस्वामीच्या बहिणीच्या खात्यात अभिनेत्री ममता कुलकणीच्या खात्यातून २ कोटी रुपये पाठवण्यात आल्याचे समोर आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
पोलीस तपासात इफेड्रीनप्रकरणी नवनवीन गोष्टी पुढे येत आहेत. यामध्ये आणखी काही गोष्टी पुढे आल्या आहेत. त्यामध्ये मध्यंतरी मुंबई जुहूतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये इफेड्रीनप्रकरणी एक बैठक झाली होती. त्याबाबतचे काही पुरावे ठाणे पोलिसांच्या हाती लागले.
याचदरम्यान, या बैठकीत जय मुखी आणि फरार आरोपी किशोर राठोड याच्यासह एक हास्य अभिनेता उपस्थित होता. त्यामुळे ज्या वेळी बैठक झाली, त्या वेळचे त्या हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेजची मागणी ठाणे पोलीस संबंधित हॉटेलवाल्यांकडे करताच, त्यांनी हॉटेलमध्ये फारफार तर एक महिन्याचे फुटेज मिळेल, असे पोलिसांनी सांगितले. हा अभिनेता १९९७
साली दुबईत झालेल्या विकी गोस्वामी याच्या कार्यक्रमास हजर राहिल्याचे सूत्रांनी सांगितले. (प्रतिनिधी)
>राठोड कुटुंबीयांची चौकशी सुरू
पोलिसांच्या रडारवर असलेल्या किशोर राठोड यांच्या आईवडील, बहीण आणि पत्नी यांच्यासह १५ जणांना ठाणे पोलिसांनी नोटीस बजावून चौकशीला हजर राहण्यास बजावले आहे. त्यानुसार, किशोरचे आईवडील, पत्नी आणि बहिणीची चौकशी सुरू आहे. उर्वरितांमध्ये त्याचे काही नातेवाईक, मित्रमैत्रिणींचा समावेश असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
विकीच्या बहिणीचे खाते गोठवले
विकी गोस्वामी याची गुजरात येथे राहणारी रीटा बेन-गोस्वामी (५२) हिच्या एका बँक खात्याच्या तपासणीत तिच्या खात्यावर मागील काही वर्षांपासून ममता कुलकर्णी हिच्या खात्यातून जवळपास दोन कोटी रुपये असल्याचे समोर आले. त्यानंतर, पोलिसांनी तिचे ते बँक खाते गोठवले आहे. तसेच तिलाही नोटीस बजावून चौकशीस हजर राहण्यास सांगितल्याची सूत्रांनी दिली.

Web Title: Bollywood comedians in ephedrine case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.