मुलाच्या अंगावर फेकले उकळते पाणी
By Admin | Updated: September 28, 2016 20:00 IST2016-09-28T20:00:59+5:302016-09-28T20:00:59+5:30
केस परत का घेत नाही या कारणावरुन १२ वर्षीय मुलाच्या अंगावर उकळते पाणी फेकून त्यास जिवे मारण्याचा प्रयत्न केला

मुलाच्या अंगावर फेकले उकळते पाणी
ऑनलाइन लोकमत
बीड, दि. 28 - केस परत का घेत नाही या कारणावरुन १२ वर्षीय मुलाच्या अंगावर उकळते पाणी फेकून त्यास जिवे मारण्याचा प्रयत्न केला. शहरातील माऊलीनगरात ही घटना बुधवारी पुढे आली. ऋषीकेश भगवान खाडे असे भाजलेल्या मुलाचे नाव असून, त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मारुती धोंडिबा उगलमुगले, विजया मारुती उगलमुगले (दोघे रा. ज्ञानेश्वरनगर, बीड), विष्णू शिवराम सोनवणे (रा. कालिकानगर, बीड), चंदू धोंडिबा उगलमुगले (रा. करंजवन ता. पाटोदा) यांचा आरोपींत समावेश आहे.
आरोपींनी ऋषीकेशची आई सुरेखा खाडे यांच्या घरात प्रवेश करून जुन्या भांडणातील केस परत घ्या अशी हुज्जत घातली. यावेळी जवळच उभ्या असलेल्या ऋषीकेशच्या अंगावर गरम पाणी टाकले. यात तो गंभीरपणे भाजला. सुरेखा खाडे यांच्या फिर्यादीवरुन शिवाजीनगर ठाण्यात गुन्हा नोंद झाला. तपास सहायक निरीक्षक यशवंत बारवकर करत आहेत.