चेंबूरमधील RCFमध्ये बॉयलर स्फोट, 3 कामगारांचा मृत्यू
By Admin | Updated: July 2, 2016 19:08 IST2016-07-02T19:02:21+5:302016-07-02T19:08:33+5:30
चेंबूरमधील आरसीएफमध्ये शनिवारी संध्याकाळी बॉयलरचा स्फोट झाला. या स्फोटात 3 कामगारांचा मृत्यू झाला असून 5 जखमी झाले आहेत

चेंबूरमधील RCFमध्ये बॉयलर स्फोट, 3 कामगारांचा मृत्यू
>
ऑनलाइन लोकमत -
मुंबई, दि. 02 - चेंबूरमधील राष्ट्रीय केमिकल अॅंड फर्टीलायझर (आरसीएफ) मध्ये शनिवारी संध्याकाळी बॉयलरचा स्फोट झाला. या स्फोटात 3 कामगारांचा मृत्यू झाला असून 5 जखमी झाले आहेत. 6 वाजण्याच्या सुमारास हा स्फोट झाला. जखमींना आरसीएफच्या रुग्णालयात उपचारासाठी भरती केलं आहे. तर एकाला चेंबुरच्या एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले आहे. हा स्फोट नेमका कशामुळे झाला याची माहिती अजून आरसीएफकडून मिळालेली नाही. पण बॉयलर बंद होता, त्याच्या दुरुस्तीचं काम सुरु असताना हा स्फोट झाला अशी माहिती मिळत आहे.