कोल्हापूर : कौटुंबिक वादातून प्रेयसीच्या चेहऱ्यावर कढईतील उकळते तेल फेकून तिला गंभीर जखमी करणाऱ्या प्रियकरास शुक्रवारी राजारामपुरी पोलिसांनी अटक केली. प्रवीण मनमत्ताप्पा मिरचे (वय ३०, रा. पाचगाव, ता. करवीर) असे त्याचे नाव आहे. प्रवीण मिरचे याचे कोल्हापूर येथील राजोपाध्येनगर येथे राहणाऱ्या १९ वर्षांच्या तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. गेल्या काही दिवसांपासून दोघे जण राजेंद्रनगर येथे एकत्र राहत होते. चार दिवसांपूर्वी त्यांच्यात कौटुंबिक कारणावरून वाद झाला. यावेळी प्रवीणने स्टोव्हवरील कढईतील उकळते तेल तिच्या चेहऱ्यावर फेकले. त्यामध्ये ती भाजून गंभीर जखमी झाली. तिला खासगी रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर गुरुवारी संबंधित तरुणीने प्रियकर प्रवीणविरोधात पोलिसांत फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी ही कारवाई केली. (प्रतिनिधी)
तिच्या चेहऱ्यावर फेकले उकळते तेल
By admin | Updated: February 20, 2016 03:11 IST