तरुणाचा मृतदेह थेट पोलीस ठाण्यात

By Admin | Updated: April 18, 2016 01:26 IST2016-04-18T01:26:42+5:302016-04-18T01:26:42+5:30

नगर तालुक्यातील कामरगाव परिसरात एका ३० वर्षीय तरुणाचा मृतदेह रविवारी सकाळी आढळून आला. हा मृतदेह झेंडीगेट येथील तरुणाचा होता. त्याचा खून झाल्याचा संशय व्यक्त करीत

The body of the youth is directly in the police station | तरुणाचा मृतदेह थेट पोलीस ठाण्यात

तरुणाचा मृतदेह थेट पोलीस ठाण्यात

अहमदनगर : नगर तालुक्यातील कामरगाव परिसरात एका ३० वर्षीय तरुणाचा मृतदेह रविवारी सकाळी आढळून आला. हा मृतदेह झेंडीगेट येथील तरुणाचा होता. त्याचा खून झाल्याचा संशय व्यक्त करीत नातेवाईकांनी मृतदेह थेट नगर तालुका पोलीस ठाण्यात आणला. त्यामुळे रविवारी सायंकाळी पोलीस ठाण्यात तणाव निर्माण झाला होता. पोलिसांच्या आश्वासनानंतर अखेर मृतदेह रात्री उशिरा नातेवाईकांनी ताब्यात घेतला.
रविवारी सकाळी कामरगाव परिसरातून पोलिसांनी ताब्यात घेतलेला मृतदेह झेंडीगेट येथील अन्वर पटेल (३०) या तरुणाचा असल्याचे चौकशीत निष्पन्न झाले. जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर दुपारी मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. तरुणाचा मृत्यू नैसर्गिक किंवा अपघाताने झालेला नसून त्याचा खून केल्याचा संशय नातेवाईकांनी व्यक्त केला. या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करून घ्यावा, अशी मागणी नातेवाईकांनी केली. यासाठी मृतदेहासह नातेवाईकांनी ठिय्या दिला.

Web Title: The body of the youth is directly in the police station