दोन वर्षीय चिमुकल्याचा मृतदेह विहिरीत आढळला

By Admin | Updated: July 1, 2016 00:39 IST2016-07-01T00:39:09+5:302016-07-01T00:39:09+5:30

खामगाव तालुक्यातील टेंभूर्णा शिवारात आढळला मृतदेह; खूनाचा संशय.

The body of two-year-old Chimukala found in the well | दोन वर्षीय चिमुकल्याचा मृतदेह विहिरीत आढळला

दोन वर्षीय चिमुकल्याचा मृतदेह विहिरीत आढळला

खामगाव (जि. बुलडाणा) : तालुक्यातील टेंभूर्णा शिवारातील विहिरीत दोन वर्षाच्या चिमुकल्याचा मृतदेह गुरुवारी आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. या घटनेबाबत पोलिसांनी खूनाचा संशय व्यक्त केला आहे. राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ वरील टेंभूर्णा शिवारात राहूल खंडेलवाल यांचे शेत आहे. त्यांच्या शेतातील विहिरीत सायंकाळच्या सुमारास दोन वर्षाच्या बालकाचा मृतदेह तरंगलेल्या अवस्थेत बकर्‍या चारणार्‍या इसमास आढळला. घटनेची माहीती मिळताच पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरु होती. निर्दयतेचा कळस विहिरीतून बाहेर काढलेल्या चिमुकल्याच्या मृतदेहाची पाहणी केली असता या चिमुकल्याचे दोन्ही पाय दोरानी बांधलेले दिसून आले. त्याचप्रमाणे कमरेला दगड बांधून एका कापडामध्ये गुंडाळलेला सदर मृतदेह आढळून आला.

Web Title: The body of two-year-old Chimukala found in the well

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.