शहीद दीपक घाडगे यांचे पार्थिव आज पुण्यात आणणार

By Admin | Updated: March 11, 2017 04:16 IST2017-03-11T04:16:40+5:302017-03-11T04:16:40+5:30

पूंछ जिल्ह्यात नियंत्रण रेषेजवळ पाकिस्तानच्या गोळीबारात शहीद झालेले साताऱ्याचे जवान दीपक जगन्नाथ घाडगे (२७) यांचे पार्थिव शनिवारी पुण्यात आणण्यात येईल.

The body of martyr Deepak Ghadge will be brought to Pune today | शहीद दीपक घाडगे यांचे पार्थिव आज पुण्यात आणणार

शहीद दीपक घाडगे यांचे पार्थिव आज पुण्यात आणणार

जम्मू : पूंछ जिल्ह्यात नियंत्रण रेषेजवळ पाकिस्तानच्या गोळीबारात शहीद झालेले साताऱ्याचे जवान दीपक जगन्नाथ घाडगे (२७) यांचे पार्थिव शनिवारी पुण्यात आणण्यात येईल. सैन्याच्या अधिकाऱ्याने सांगितले की, आयएएफचे विमान सकाळी जम्मूहून पुण्याकडे निघेल. संरक्षण विभागाचे जनसंपर्क अधिकारी ले. कर्नल मनिष मेहता यांनी सांगितले की, शुक्रवारी झालेल्या चकमकीत दीपक हे शहीद झाले. पुण्याहून पार्थिव हेलिकॉप्टरने सातारा तालुक्यातील त्यांच्या गावी नेण्यात येईल.

Web Title: The body of martyr Deepak Ghadge will be brought to Pune today