वसईत शाळेच्या आवारात आढळला तरुणीचा मृतदेह
By Admin | Updated: July 4, 2016 09:49 IST2016-07-04T09:49:03+5:302016-07-04T09:49:03+5:30
वसईतील विद्या विकासनी शाळेच्या आवारात एका तरुणीचा नग्नावस्थेत मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे

वसईत शाळेच्या आवारात आढळला तरुणीचा मृतदेह
>ऑनलाइन लोकमत -
वसई, दि.. 04 - शहरातील विद्या विकासनी शाळेच्या आवारात एका तरुणीचा नग्नावस्थेत मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. तरुणीचं वय 25 ते 30 वर्ष असून मृतदेह पुर्णपणे कुजला आहे. शाळेच्या आवारात काही मुलं क्रिकेट खेळत असताना त्यांचा बॉल कंपाऊंडमध्ये गेला होता. बॉल आणण्यासाठी गेले असता काही मुलांना हा मृतदेह आढळला. तरुणीवर बलात्कार करुन हत्या केल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
माहिती मिळताच वालिव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. देण्यात आली. तरुणीची ओळख अद्याप पटलेली नाही. या घटनेत एकाहून जास्त व्यक्तींचा समावेश असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला होता. शवविच्छेदन अहवालानंतरच हत्येचं नेमकं कारण स्पष्ट होईल. मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याने त्याचठिकाणी पुरण्यात आला आहे.