अर्नाळा समुद्रात बुडालेल्या चार मुलांचे मृतदेह सापडले

By Admin | Updated: August 12, 2016 16:22 IST2016-08-12T16:22:59+5:302016-08-12T16:22:59+5:30

पिकनिकसाठी विरारच्या अर्नाळा समुद्रावर गेलेल्या नालासोपा-यातील चार मुलांचा गुरुवारी पाण्यात बुडून मृत्यू झाला.

The body of four children found in the Arnala Sea was found | अर्नाळा समुद्रात बुडालेल्या चार मुलांचे मृतदेह सापडले

अर्नाळा समुद्रात बुडालेल्या चार मुलांचे मृतदेह सापडले

ऑनलाइन लोकमत 

वसई, दि. १२ - पिकनिकसाठी विरारच्या अर्नाळा समुद्रावर गेलेल्या नालासोपा-यातील चार मुलांचा गुरुवारी पाण्यात बुडून मृत्यू झाला. या चार मुलांचे मृतदेह शुक्रवारी बाहेर काढण्यात आले. नालासोपाऱ्यातील लक्ष्मीबेन छेडानगरमधील सात मुले गुरुवारी पिकनिकसाठी अर्नाळा समुद्र किना-यावर गेली होती. 
 
त्यातील सहामुले समुद्रात पोहण्यासाठी उतरली होती. दोन मुले किना-यावर पाण्यात खेळत होती तर, चार जण खोल पाण्यात उतरले होते. 
 
खोल पाण्यात गेलेली चारही मुले पाण्यात ओढली गेली आणि बुडून त्यांचा मृत्यू झाला. सनी पालव, रोहन जाधव, सुजित विश्वकर्मा आणि चेतन कालप अशी मृत मुलांची नाव आहेत. ही सर्व मुलं १५ ते १६ वयोगटातील होती. 

Web Title: The body of four children found in the Arnala Sea was found

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.